वाळू वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा; ग्रामस्थ आक्रमक
गुहागर : तालुक्यातील नरवण पंघरवणे सुतारवाडी येथे होणारे वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक यामुळे पंघरवणे सुतारवाडीतील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या प्रकारामुळे पंघरवणे सुतारवाडीतील 28 कुटुंबे आक्रमक झाली असून त्यांनी रस्त्याची झालेली दुर्दशा आणि अनधिकृता वाळू उपसा, वाळूची वाहतूक या विरोधात आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी, गुहागर तहसीलदार, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे.
A total of 28 families from Pandharwane Sutarwadi have been aggressive and they have taken a stand against the road mishap and unauthorized sand extraction and sand transportation. Taking an aggressive stand against this, a statement has been issued to the District Collector, Guhagar Tehsildar, District Superintendent of Police.
गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी समुद्र, खाडी, नदीकिनारी अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. नरवण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पंघरवणे महसूल गावात सुतारवाडी स्मशानभूमीच्या परिसरात गेले १५ ते २० वर्ष संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने अवैद्य वाळू उपसा सुरू आहे. या अवैद्य वाळूच्या वाहतुकीसाठी मोडकाआगर – तवसाळ या प्रमुख रस्त्यापासून पंघरवणे स्मशानभूमीकडे जाणारा अंदाजे 500 मीटर लांबीचा रस्ता आहे. हा वाडीअंतर्गत रस्ता असून रस्त्याचा वापर या अवैद्य वाळूच्या वाहतुकीसाठी होत आहे. गेल्या १५ वर्षात या रस्त्याची कोणतीही सुधारणा शासनस्तरावर झालेली नसल्याने रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. पंघरवणे सुतार वाडीतील ग्रामस्थ स्वखर्चाने या रस्त्याची डागडुजी करतात. या वाडीच्यावतीने वाळू उपसा करणाऱ्या सर्वांना याबद्दलची माहिती देऊन समजही देण्यात आली आहे. मात्र या सर्वांचा अतिरेकपणा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. वाळू वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने ही नियमबाह्य व दुरुस्तीसाठी आलेले असतात. या वाळुसम्राटांची संघटना असुन त्याद्वारे ते स्थानीकांमधे दहशत पसरवत असुन अवैध वाळु उपशाला विरोध करणा-यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सुतारवाडीतील ग्रामस्थांना आपला जीव धोक्यात घालून रहावे लागत आहे. स्थानिक लोकांना स्वत:ची दोन चाकी, तीन चाकी,चार चाकी वाहने फिरवताना सुद्धा फार अडथळ्यांचा आणि धोक्याचा सामना करावा लागत आहे. ही वाळू वाहतूक रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाडीतील ग्रामस्थांना झोप घेता येत नाही, असे निवेदनात म्हटले आहे. यामुळे गेली १५ ते २० वर्ष वाळू उपशामुळे व वाळू वाहतुकीमुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांनी आक्रमक होत एकत्र येउन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तालुका पोलीस निरीक्षक, सरपंच, स्थानिक पोलीस पाटील यांना याबाबत निवेदन देऊन वाळू उपसा कायमस्वरूपी बंद करण्याची व रस्त्याची शासनस्तरावरून दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
नरवण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पांघरवणे सुतारवाडीतील या अवैध वाळू उपशाला गेल्या २० वर्षाचा इतिहास आहे. वाळू उपसा सर्व शासकीय यंत्रणाना माहित आहे. मात्र यावर योग्य ती ठोस कारवाई आजपर्यंत झालेली नाही.