गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
गुहागर : गुहागर बाजारपेठ ते वेलदूर मार्गावर अनेक मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे याआधी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला कल्पना देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही या मार्गावरील खड्डे जैसे थे प्रमाणे असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांची भेट घेऊन गणपतीपूर्वी मार्गावरील सर्व खड्डे बुजवा अन्यथा खड्ड्यात वृक्षारोपण करू असा इशारा देण्यात आला आहे.
गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपअभियंता श्रीमती निकम यांची भेट घेऊन गुहागर शहरातील वेलदुर – गुहागर रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल चर्चा केली. त्यावर त्यांनी लवकरात लवकर खड्डे भरले जातील असे आश्वासन दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री. मंदार कचरेकर, श्री. श्रीधर बागकर, श्री. तुषार सुर्वे आदी उपस्थित होते.
There are many big potholes on the road from Guhagar market to Veldur. These rocks have also caused accidents in the past. The idea has been given to the Public Works Department from time to time. However, even after that, the potholes on this road are still the same and as the drivers have to travel on the wire, the NCP office bearers have been advised to meet the Deputy Engineer of Public Works Department and fill all the potholes on the road before Ganpati, Otherwise we have been warned to plant trees in the pit.