शृंगारतळी येथे आय. के. टायर्स या नव्या दुकानाचा शुभारंभ
गुहागर : तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखल्या शृंगारतळीमध्ये टायर्सच्या नव्या दालनाचा शुभारंभ मंगळवार, दि. 3.11.2020 रोजी सकाळी 10.00 वाजता होत आहे. शृंगारतळी शहरातील जानवळे फाटा येथे पेट्रोलपंपाशेजारी टायर्सचे हे नवे दालन उभे राहीले आहे.
या दुकानामध्ये एम.आर.एफ., सिएट, अपोलो, मिशलिन, ब्रिजस्टोन, जे.के. आदी नामांकित कंपन्यांचे टायर्स उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर व्हिल अलायमेंट, व्हिल बॅलेंसिंग, नायट्रोजन या सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे गुहागर तालुक्यातील दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना योग्य दरात उत्कृष्ट दर्जाचे टायर्स खरेदी करणे सोपे झाले आहे. सदर दुकानाच्या शुभारंभ प्रसंगी तालुकावासीयांनी उपस्थित रहावे. अशी विनंती नासिम इसाक साल्हे, आसिम इसाक साल्हे, फाईज मो. कासीम साल्हे यांनी केली आहे.
या दुकानाच्या अधिक माहिती साठी 9623272232 या क्रमांकावर फोन करा.