गुहागर : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय(New English School and Junior College) पाटपन्हाळे विद्यालयातील इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी कुमारी समृद्धी सुरेश आंबेकर हिने मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीतर्फे(Margatamhane Education Society) भारतीय स्वातंत्र्याचा(Indian independence) अमृतमहोत्सव(Amritmahotsav) निमित्त “उत्सव स्वातंत्र्याचा, गौरव स्वातंत्र्यवीरांचा ” ((“Celebration of freedom, glory of freedom fighters”) या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या निबंध स्पर्धेत(Essay Competition) प्राथमिक गटात प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल तसेच शालेय व शाळाबाह्य उपक्रम कार्यक्रमातील सुयश संपादन केल्याबद्दल गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर(Guhagar Taluka Press Club Guhagar) संस्थेतर्फे पत्रकार दिनी(Journalist’s Day) शृंगारतळीमधील उद्योजक नासिम मालाणी(Entrepreneur Nasim Malani) यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी गुहागर पंचायत समितीचे(Guhagar Panchayat Samiti) गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले, पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पवार, उद्योजक(Entrepreneur) गुलामभाई तांडेल, गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागरचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, आबलोलीचे सामाजिक कार्यकर्ते(Social workers) विद्याधर उर्फ आप्पा कदम, गुहागर तहसीलदार कार्यालयातील(Guhagar Tehsildar’s Office) पुरवठा अधिकारी(Supply officer) श्री. प्रभूदेसाई, पत्रकार गणेश धनावडे(Journalist Ganesh Dhanawade) व गुहागर तालूका प्रेस क्लब(Guhagar Taluka Press Club) गुहागरचे पदाधिकारी उपस्थित होते.