नगरसेवक अमोल गोयथळे : बचत गटांना साहित्याचे वाटप
गुहागर, ता. 14 : गुहागर नगरपंचायतीचे माजी आरोग्य आणि स्वच्छता समिती सभापती व प्रभाग १६ चे कार्यतत्पर नगरसेवक अमोल प्रताप गोयथळे यांच्या वाढदिवसानिमित्त (दि. १२ जाने. रोजी) कोविड योद्यांचा सन्मान (Honor of Covid Warriors), विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार (honur of meritorious students) आणि बचत गटांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.(Honor of student, workers on birthday)
नगरसेवक अमोल गोयथळे यांचा वाढदिवस 12 जानेवारीला असतो. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या सहकार्याने खालचापाट येथील जांगळेवाडी अंगणवाडी मधील मुलांना शैक्षणिक साहित्य, खेळणी, खाऊचे वाटप केले. त्यानंतर कोरोना काळात जीवाची पर्वा न करता, योगदान देणाऱ्या नेहा वराडकर, दिक्षा माटल, निधी सुर्वे, नेहा वराडकर, सोनल पावसकर, दक्षता मोरे, अंकिता वराडकर, रक्षा आरेकर आदींना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मनोज पाटील यांचा प्रशस्तीपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. महिला बचत गटांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जबाबदाऱ्या गुहागर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी हालअपेष्टा सहन करत यशस्वी केल्या. या कर्मचाऱ्यांचा गौरव ही अमोल गोयथळे यांनी केला. (Honor of student, workers on birthday)
यावेळी बोलताना महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मनोज पाटील म्हणाले की, नगरसेवक म्हणून काम करताना अमोल गोयथळे यांनी आपल्या प्रभागात अनेक विकास कामे केली आहेत. नगरसेवक गोयथळे यांनी आपल्या वाढदिवसादिनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम केलेल्या कोविड योद्धे यांचा केलेला सन्मान (Honor of student, workers on birthday) हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत काम करणाऱ्या योद्यांसाठी प्रोत्साहन ठरणार आहे. समाजात अशाप्रकारे काम करणारे लोकप्रतिनिधी निर्माण होणे काळाची गरज आहे, असे मत श्री. पाटील यांनी व्यक्त केले.
नगरसेवक अमोल गोयथळे यांनी सांगितले की, आपल्याला जेव्हढे शक्य होईल त्या पद्धतीने माझा व इतर प्रभागातील नागरिकांना मदत करण्याचे काम करत आहे.
सायंकाळी अमोल गोयथळे यांच्या निवासस्थानी वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी शुभेच्छा देण्यासाठी आली होती. यावेळी अमोल गोयथळे यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर निलेश ढेरे, महावितरणचे वायरमन समिर म्हादे, आरोग्य सेवक अमित भोसले, इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात तिसरी आलेली आर्या मंदार गोयथळे, गुणवत्ता यादीत आलेली सान्वी संकेत गोयथळे यांचाही भेटवस्तू देऊन सत्कार केला. (Honor of student, workers on birthday)
या सत्कार प्रसंगी बोलताना डॉ. निलेश ढेरे म्हणाले, कोरोना काळात आम्ही आमचे प्रामाणिकपणे काम केले. आमचे ते कर्तव्यच असले तरी आपण केलेल्या कामाची समाज म्हणून घेतलेली दखल ही खरी आमच्या कामाची पोच पावती आहे. त्यामुळे आमच्यावरील जबाबदारी आणखी वाढली आहे.
यावेळी महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज पाटील, सुनील गोयथळे, दिलीप गोयथळे, विवेक मोरे, शोधन वराडकर, नितीन गोयथळे, प्रभुनाथ देवळेकर, राकेश गोयथळे, अनिल गोयथळे, योगेश गोयथळे, संकेत गोयथळे, मंदार गोयथळे, प्रसाद जांगळी, पराग भोसले, महेंद्र पाटील, विद्याधर गोयथळे, तुषार मोरे, किशोर भागडे, समिल मोरे, प्रकाश विखारे, श्री. अनिता धनावडे, रेखा घाडे आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. (Honor of student, workers on birthday)