एक हजार कुटुंबांना जीवनावश्यक किटचे वाटप
गुहागर : भीषण महापुरात अडकलेल्या चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या गुहागर शहरातील सर्वेश भावे सेवा मित्र मंडळाच्यावतीने एक हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू, कपडे व इतर साहित्याची भरघोस मदत करण्यात आली.
The Sarvesh Bhave Seva Mitra Mandal in Guhagar, which has always been at the forefront of social work to help the flood-hit Chiplun flood victims, provided a lot of essential items, clothes and other necessities to one thousand families.
बुधवार 22 जुलै रोजी चिपळूण शहराला पुराच्या पाण्याने वेडा घातल्याने नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. पुराचे पाणी ओसरले असले तरी पूरग्रस्तांना अन्न व पाण्याची नितांत गरज आहे. तसेच कपडे व अन्य साहित्याची गरज ओळखून चिपळूण पूरग्रस्तांना पहिल्या टप्प्यातील तातडीची मदत म्हणून सर्वेश भावे सेवा मित्र मंडळावतीने 1000 अन्न धान्य किट, 250 फ्लोअर वायपर, 250 गाऊन, 200 बर्मुडा, सॅनिटरी नॅपकिन, स्त्री पुरुष अंतर वस्त्रे, लहान मुलांचे कपडे, 700 टॉवेल, 1000 पायाला लावायला क्रीम, 5000 लिटर पिण्याचे पाणी, 25 डझन केळी आदी साहित्य चिपळूण मधील बापट आळी, शंकर वाडी, मार्कंडी, पेठमाप, बुरटे आळी, परीट आळी, तांबट आळी, सांस्कृतिक केंद्राच्या बाजूला, कळंबस्ते विठ्ठल पेठ, पेठमाप वाणी आळी, रॉयल नगर, कळंबस्ते शिगवण वाडी, खेर्डी दत्त वाडी, माळे वाडी, दळवटणे व खेंड या पूरग्रस्त भागात मदत घरपोच पोचवण्यात आली. तसेच चिखलाने माखलेल्या 10 घरांची श्रमदान करून साफसफाई केली.
या मदत कार्यात सर्वेश भावे, अक्षय खरे, अमरदीप परचुरे, अमित कामेरकर, मंदार पालशेतकर, हेमंत बारटक्के, सागर लाड, मनोज बारटक्के, प्रशांत रहाटे, अमित कावणकर, मयुरेश आठवले, प्रथमेश दामले सहभागी झाले होते. सर्वेश भावे सेवा मित्र मंडळाने चक्रीवादळाचा फटका बसलेल्या दापोली तालुक्यात वादळग्रस्थाना मोठी मदत केली होती.