Hedvi Dashbhuja Laxmi Ganesh : गर्दी न करण्याचे देवस्थानचे आवाहन
गुहागर, ता. 29 : तिसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून शासनाने निर्बंध जाहीर केले आहेत. एक संस्था म्हणून सामाजिक आरोग्याचा गांभिर्याने विचार करुन शासनाच्या नियमांचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यामुळे हेदवीच्या श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरात भरणारी (Hedvi Dashbhuja Laxmi Ganesh) माघी यात्रा रद्द करुन गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे. अशी माहिती या देवस्थान संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोगळेकर यांनी दिली आहे.


हेदवीमधील श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरात Hedvi Dashbhuja Laxmi Ganesh दरवर्षी माघ चतुर्थीला यात्रा भरते. या उत्सवाचे तसेच मंदिराचे कामकाज हेदवीमधील श्री लक्ष्मीनारायण देवस्थान संस्था पहाते. या यात्रेसाठी मुंबई, पुणे येथून अनेक भक्तमंडळी येतात. विशेष करुन मच्छीमार समाजामधील शेकडो भक्त यावेळी आपला व्यवसाय बंद ठेवून दोन दिवस हेदवीत मुक्कामाला असतात. त्या सर्वांपर्यंत कोविडच्या तिसऱ्या लाटेतील निर्बंधात होणाऱ्या उत्सवाची माहिती पोचावी म्हणून श्री श्री लक्ष्मीनारायण देवस्थान संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोगळेकर यांनी एक निवेदन प्रसिध्दीसाठी दिले आहे.


या निवेदनात म्हटले आहे की, हेदवीच्या श्री दशभुजलक्ष्मी गणेशाचा माघी जन्मोत्सव Hedvi Dashbhuja Laxmi Ganesh यावर्षी शुक्रवार दि. 4.2.2022 ते रविवार दि. 6.2.2022 असा तीन दिवस साजरा होणार आहे. जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे शासनाने कार्यक्रमांवर निर्बध घातले आहे. हे निर्बंध माघी जन्मोत्सवाबाबतीत देखील लागू आहेत. त्यामुळे माघी जन्मोत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रम पूर्वीप्रमाणेच पार पडणार आहेत. मात्र 50 व्यक्तींच्या उपस्थितीचे बंधनामुळे मंदिर परिसरात गर्दी होऊन चालणार नाही. अशावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही काटेकोर नियमांचे पालन करावे लागणार आहे. भक्तांनी एकाच वेळी मंदिरात गर्दी न करता, श्रींचे दर्शन घेऊन झाल्यावर मंदिर परिसरातून बाहेर पडावे व आपल्या मागे दर्शनासाठी उभ्या असणाऱ्या भक्तांना दर्शनाचा लाभ द्यावा. या संदर्भात सर्व भक्तगणांनी सहकार्य करावे. Hedvi Dashbhuja Laxmi Ganesh