• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

by Ganesh Dhanawade
February 11, 2021
in Old News
16 0
0
वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : भ.क.ल.वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण व साथ चॅरीटेबल ट्रस्ट, वेळणेश्वर यांच्या तर्फे पिवळ्या ,केसरी व पांढऱ्या रेशनकार्ड धारकांसाठी आरोग्य १७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तज्ञांच्या तपासणीत शस्त्रक्रिया करण्याची आवशक्यता  असल्यास सदरील शस्त्रक्रिया अल्पदारात फेब्रुवारी व मार्च महिन्यात करण्यात येणार आहेत. तरी गुहागर तालुक्यातील गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरात  हर्निया, अपेंडिक्स, पित्तशयातिलखडे, अल्सर, प्रोस्टेटग्रंथी, मूळव्याध, मुतखडे, चरबीच्या गाठी, थायरॉईड, महीलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया, नाक – कान – घसा शस्त्रक्रिया, नाकाचा हाड वाढने, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, टॉन्सिल्स, मोतिबिन्दु आदी शस्त्रक्रियाबाबत तपासणी आणि आवश्यक असल्यास दिलेल्या कालावधी शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

         सदरील आरोग्य तपासणी “विवेकानंदालय” साथ साथ चॅरीटेबल ट्रस्ट, पिंपर रोड, गावराखा व MSEB सब स्टेशन पुढे, वेळणेश्वर, ता. गुहागर येथे होणार आहे. पिंपर फाटा वेळणेश्वर येथुन मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. तरी लाभार्थ्यांनी  नोंदणीसाठी शरद जोशी – 9869459804, 7028129804 ,प्रकाश देवळे – 7767055729 यांच्याकडे स.११:00 ते सं.२ पर्यत संपर्क साधावा.

Tags: "विवेकानंदालय"GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्याभ.क.ल.वालावलकर रुग्णालय डेरवणमराठी बातम्यालोकल न्युजसाथ साथ चॅरीटेबल ट्रस्ट
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.