मनसे नेते शिरीष सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त छत्र्यांचे वाटप
गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुहागर तालुका मनसेच्या वतीने गुहागर तालुक्यातील पत्रकारांना छत्री व मास्क वाटप करण्यात आले. तसेच सर्व पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
Guhagar taluka MNS distributed umbrellas and masks to journalists in Guhagar taluka on the occasion of the birthday of Maharashtra Navnirman Sena leader Shirish Sawant. Also, all the journalists were honored with certificates of covid worrior.
मनसे नेते शिरीष सावंत यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. त्याच प्रित्यर्थ गुहागर मनसे तर्फे ग्रामपंचायत पाटपन्हाळेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये छत्र्या, मास्क यांचे वाटप करण्यात आले. सर्व पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले.
सदरचा कार्यक्रम हा पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर , रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विश्वास मुधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर, जेष्ठ व्यवसायिक महाराष्ट्र सैनिक प्रमोद सीताराम गांधी त्यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
यावेळी माजी तालुका अध्यक्ष राजेश शेटे, अध्यक्ष विनोद जानवलकर, तेजस पोफळे, वैभवी जानवळकर, स्वप्नील कांबळे, संजय भुवड, मयुरी शिगवन, रुपेश घवाले, दिनेश निवाते, नितिन कारकर, ऋतिक गावणकर, वनिता निवाते, संकेत खांबे कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांना कोविड योध्दा म्हणून गौरव करण्यात आला. यामध्ये दिनेश चव्हाण, मयुरेश पाटणकर, सत्यवान घाडे, गणेश कीर्वे, उमेश शिंदे, संकेत गोयथळे, मंदार गोयथळे, निसारखान सरगुरो, पराग कांबळे, मनोज बावधनकर, गणेश धनावडे, सुरेश आंबेकर, संतोष पवार, विनोद चव्हाण, आशिष कारेकर,अमोल पोवळे,सुभाष जाधव,पिंट्या पाटील,मंगेश तावडे,सूरज आंबोकर, अदनान खान, आदी पत्रकारांना सन्मानपत्र, मास्क व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.