गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या नेतृत्वाखाली चिखली जनसंपर्क कार्यालय येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक पार पडली.
यावेळी पक्षवाढीसाठी गुहागर तालुक्याची नियोजन कमिटी स्थापन करण्यात आली. तसेच तालुक्यातील अनेक रिक्त पदांच्या जागी नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये पाटपन्हाळे गण विभाग अध्यक्ष पदी श्रीराम सूर्यकांत विचारे, पालशेत गण उपविभाग अध्यक्ष पदी प्रसाद माधव विखारे, कोतळूक गण विभाग अध्यक्ष पदी संजय बाबाजी भुवड, कोतळूक शाखा अध्यक्ष पदी दिनेश कृष्णा निवाते, रानवी गट अध्यक्ष पदी श्रुतिक भास्कर गावणकर, अंजनवेल विभाग अध्यक्ष पदी तेजस किसन पोफळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी शौनक रत्नाकर अवेरे, अंकेश अनंत भुवड या तरुणांनी मनसेमध्ये प्रवेश केला. यावेळी मनसे उपतालुका अध्यक्ष विराज सुर्वे, धर्मराज कदम,सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव, नम्रता भाटकर, कौस्तुभ कोपरकर, संजोग देवकर, निलेश गमरे, विराज साळवी, नितीन भुवड यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.