गुहागर : विविध राज्यातून आलेल्या 60 दुचाकी स्वारांचे पालशेत आणि गुहागर शहरात स्वागत करण्यात आले. यावेळी जुन्या गाड्या पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. शनिवारी दुपारी 11.30 च्या दरम्यान कोकण हेरिटेज राईडमधील दुचाकी पालशेत मध्ये पोचल्या. तेथील मारुती मंदिर येथे श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना पालकर, अशोक चव्हाण, अंकुश बोटके, कैलास मांडवकर, प्रल्हाद मांडवकर, अजय बोटके, देवळे मँडम, प्रकाश मिरवणे यांनी सर्व दुचाकीस्वारांचे स्वागत केले. प्रवीण रणपिसे, जयंत पाखोडे, समीर सोनार आदी 15 जणांचा गुलाबपुष्प देवून सत्कार केला. यावेळी पालशेतमधील ग्रामस्थांना काही दुचाकी स्वारांनी जुन्या दुचाकींची माहिती दिली.
Coming from the state Of 60 two-wheelers bikers Welcome to Palshet and Guhagar. At this time people had crowded to see the old cars.Saturday between 11.30am The two-wheeler from Konkan Heritage Ride reached Palshet. Welcoming all the two-wheelers bikers at the Maruti Mandir there.


गुहागर रायडर क्लबच्या वतीने पुणे येथील हौशी रायडर प्रवीण रणपिसे, समीर सोनार, जयंत पाखोडे यांचे गुहागर मध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी गुहागर रायडर क्लब चे सदस्य शामकांत खातू, मनिष मोरे, अमरदीप परचुरे, अमित मोरे, विरेश बागकर व शांताई रिसॉर्ट चे सिद्धेश खानविलकर उपस्थित होते.
आजच्या या युगात १९ ६१- ७१ पासून ची ते १९९४ अशी जुन्या विंटेज बाईक पाहण्याची संधी आम्हां गुहागर वासीयांना मिळाली आम्ही भारावुन गेलो.
– शामकांत खातू



