गुहागर : ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची(Pre-Upper Primary Scholarship Exam) गुणवत्ता यादी(Quality list) नुकतीच जाहीर झालेली आहे. त्यात गुहागर शहरातील जिल्हा परिषद जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. १(Zilla Parishad Jeevan Shikshan Shala Guhagar no. 1) शाळेने प्रतिवर्षाप्रमाणे घवघवीत यश(Success) संपादन केलेले आहे.
वृषभ नरेश दाभोळकर या विदयार्थ्याने शहरी विभागात जिल्हा यादीत एकविसावा तर तालुका यादीत दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. रागिनी दिलीप पाखरे ही विद्यार्थीनी जिल्हा यादीत एकोणसत्तरावी तर तालुका यादीत पाचव्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत आलेली आहे. हे दोन्ही विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक(Scholarship holder) बनलेले आहेत. तसेच श्रीया निलेश आरेकर व धनश्री काशिनाथ गावित या दोन विद्यार्थीनी शिष्यवृत्ती परीक्षेत(Scholarship Exam) उत्तीर्ण(Passed) झाल्या आहेत.
सरावातील सातत्य(Continuity) व विद्यार्थ्यांची मेहनत(Hard work) यामुळेच हे यश मिळाल्याचे वर्गशिक्षक(Class teacher) अमोल धुमाळ यांनी सांगितले. तर निकालाबाबत मुख्याध्यापिका(Headmistress) विद्या हिरवे यांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी(Group Education Officer) वामनराव जगदाळे, शिक्षण विस्ताराधिकारी(Education Extension Officer) लीना भागवत, केंद्रप्रमुख(Head of Center) श्री. लोहकरे तसेच शाळा व्यवस्थापन समिती(School Management Committee) व पालक (parents) यांनी यशस्वी विद्यार्थी व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.