• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर राष्ट्रवादीने केला स्वच्छ -सुंदर समुद्रकिनारा !

by Ganesh Dhanawade
December 12, 2020
in Old News
16 0
0
गुहागर राष्ट्रवादीने केला स्वच्छ -सुंदर समुद्रकिनारा !
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवारी सकाळी गुहागर समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुहागर बाजारपेठ समोरील समुद्रकिनारा स्वच्छ – सुंदर केला.
खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून डिसेंबर अखेरीस गुहागर समुद्र किनार्‍यावर पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३०  वाजता स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. किनार्‍यावर प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोलच्या डिश, पाण्याच्या बॉटल असा कचरा गोळा केला.
यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, नगराध्यक्ष राजेश बेंडल, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर, गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर, उपशहरध्यक्ष रोहित मालप, शशांक भाटकर, सौरभ भागडे, मृदुला भागडे, श्रुतिका भागडे, निखिल रेवाळे, राकेश राऊत, आयुष कदम, मिहीर बारटक्के, दिवेश बेंडल आदिंसह विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते.

Tags: GuhagarGuhagar BeachGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarखासदार शरद पवारगुहागर समुद्रकिनाराटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलोकल न्युजविद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.