गुहागर शहर भाजपचे तहसीलदार यांना निवेदन
गुहागर : येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या जीवरक्षकांचा(Lifeguards) पगार(Salary) देण्यात न आल्याने जीवरक्षकांनी काम थांबविले आहे. यामुळे पर्यटकांची(Tourists) गैरसोय(Inconvenience) होत आहे. नगरपंचायत(Nagar Panchayat) प्रशासनाने या जीवरक्षकांचा थकलेला पगार देऊन त्यांना यापुढेही किनाऱ्यावर तैनात ठेवावे, अशा मागणीचे निवेदन गुहागर शहर भारतीय जनता पार्टीच्या(Guhagar City Bharatiya Janata Party) वतीने गुहागर नगरपंचायतीला(Guhagar Nagar Panchayat) देण्यात आले. जीवरक्षकांची दखल न घेतल्यास समुद्रात कोणतीही दुर्घटना(Accident) घडल्यास त्याला सर्वस्वी नगरपंचायत जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील किनाऱ्यावर गेली ४ वर्ष नगर पंचायतीतर्फे जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. नेमणूक झाल्यापासून या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना गुहागर समुद्र किनारपट्टीवर घडलेली नाही. तसेच चिपळूण येथे पूर(Flood) परिस्थिती उद्भवली असताना लोकांच्या मदतीसाठी नगरपंचायतीने या जीवरक्षकांना पाठवले होते. तीच परिस्थिती गुहागर बाग मोहल्ला(Guhagar Bag Mohalla) येथे उद्भवली तेव्हा देखील या जीवरक्षकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शंभर टक्के योगदान देत लोकांना वाचवले होते. त्याचबरोबर कोरोना काळात(During the Corona period) देखील नगरपंचायत क्षेत्रातील प्रत्येक घरात जाऊन मास्क, गोळ्या वाटणे, नागरिकांचे टेम्प्रेचर तपासण्याचे काम चोख वाजविले. गेल्या ४ वर्षात कित्येक पर्यटकांचे प्राण वाचविले आहेत.
हे जीवरक्षक प्रत्येक काम जीवावर उद्धार होऊन करत असताना नगरपंचयात प्रशासन त्यांच्या पगाराकडे दुर्लक्ष करत आहे. ऐन पर्यटन(Tourism) हंगामामध्ये जीवरक्षक किनाऱ्यावर कार्यरत नसतील आणि कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी(Loss of life) झाल्यास त्याला सर्वस्वी गुहागर नगरपंचायत जबाबदार असेल, असे निवेदन तहसीलदार(Tehsildar), पोलीस निरीक्षक(Inspector of Police) यांना देण्यात आले आहे. यावेळी गुहागर शहराध्यक्ष संगम मोरे, स्वीकृत नगरसेवक श्री. संजय मलाप, गुहागर शहर युवामोर्चा अध्यक्ष श्री. मंदार पालशेतकर, गुहागर शहर युवामोर्चा सचिव श्री. प्रथमेश परांजपे गुहागर शहर महिला आघाडी श्रीम. नेहा वराडकर आदी उपस्थित होते.