किनाऱ्याला आलेल्या मृत जनावरांचे दफन; नगरसेवक अमोल गोयथळे, उमेश भोसलेंनी केला पाणी पुरवठा
गुहागर : चिपळूणमध्ये उद्भवलेली पूरपरिस्थिती ही 2005 पेक्षाही खूप भयावह आहे. या पुराचा संपूर्ण चिपळूण शहराला मोठा फटका बसला आहे. घरे, दुकाने, इमारतींमध्ये पुराचे पाणी शिरल्याने काहींचे संसार तर काहींना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. मोठ्या संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांसाठी गुहागर नगरपंचायतीने पहिल्या दिवसापासून मदतीचा हात पुढे केला आहे.
The flood situation in Chiplun is even worse than in 2005. The entire city of Chiplun has been hit hard by the floods. Floods in inundate homes, shops, and buildings, causing great financial loss to some. Guhagar Nagar Panchayat has extended a helping hand to the flood victims from day one.
चिपळूणवासीयांना नगरपंचायतीच्या 17 प्रभागातून तिथल्या नगरसेवक व काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू, कापडे गोळा करण्यात आले होते. नगरपंचायतीने प्रत्येक प्रभागात गाडी फिरून केलेल्या आवाहनाला नागरिकांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला. शिवाय शहरातील व्यापाऱ्यांनाही याकामी मदत केली. आज (25 जुलै रोजी ) दुपारी जीवनावश्यक वस्तू, कपडे, पाणी आदी साहित्याचे दोन वाहने भरून चिपळूणकडे रवाना केली. दरम्यान, नगरपंचायतच्या वतीने तातडीची मदत म्हणून शुक्रवारी 23 रोजी तात्काळ 350 बिस्लरीच्या बॉटल 1100 मेणबत्त्या, 25 किलो फरसाण, 200 बिस्कीट पुडे आणि ब्रेड अशा स्वरूपाची मदत करण्यात आली होती.
शिवाय स्वच्छता व आरोग्य सभापती अमोल गोयथळे, नगरसेवक आणि भाजप गटनेते उमेश भोसले यांनी 50 पाण्याचे जार दिले आहेत. तसेच या पूरस्थितीमुळे नदी पत्रातून समुद्रात वाहून आलेली अनेक मृत जनावरे गुहागर समुद्र किनारी आली आहेत. या सर्वांचे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी वाळूमध्येच खड्डा काढून दफन केले आहे.
सदरील मदत रवाना करतेवेळी नगराध्यक्ष राजेश बेंडल, उपनगराध्यक्ष स्नेहा भागडे, नगरसेवक अमोल गोयथळे, उमेश भोसले, प्रसाद बोले, माधव साटले, मुख्याधिकारी कविता बोरकर, कर्मचारी ओंकार लोखंडे, जनार्दन साटले, सुनील नवजेकर, चालक मंदार बोले आदींसह अन्य कर्मचारी उपस्थित होते.