गुहागर : मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल – डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला आहे. त्याचप्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने करात कपात करून जनतेला दिलासा द्यावा, या मागणी गुहागर वासीयांच्या वतीने गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीने केली आहे. तशाप्रकारचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यासाठी तहसीलदार प्रतिभा वराळे यांना देण्यात आले.
The way the Modi government has given relief to the people by reducing taxes on petrol and diesel. Similarly, the Bharatiya Janata Party (BJP) of Guhagar taluka has demanded on behalf of the people of Guhagar that the state government should provide relief to the people by reducing taxes. A similar statement was given to Tehsildar Pratibha Warale to give to Chief Minister Uddhav Thackeray.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पुर्वसंध्येला पेट्रोल वरील एक्साईज कर पाच रुपये प्रति लिटर तर डिझेल वरील एक्साईज कर दहा रुपये प्रति लिटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकूण करांचा परिणाम लक्षात घेत महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल सहा रुपये व डिझेल 12 रुपये स्वस्त झाले आहे. याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारनेदेखील महाराष्ट्रवासीयांना दिलासा द्यावा अशी भावना भाजपाने व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष यांनी सातत्याने पेट्रोल – डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलने केली. आता मोदी सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्यानंतर ठाकरे सरकारने ही कर कपात करून आपल्यावतीने पेट्रोल डिझेल दरवाढ कमी केली पाहिजे, अशी जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. मात्र, अजुनही या गोष्टीला ठाकरे सरकारकडुन टाळाटाळ होत आहे. भाजपशासित राज्यांनी करात कपात करून नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अधिक सवलत दिली आहे. मात्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने याची साधी दखलही घेतलेली नाही. राज्यात डिझेलवर 24 टक्के व्हॅट आकारला जातो आणि पेट्रोल 25% याखेरीज पेट्रोलवर प्रतिलिटर 9 रूपये सेसही आहे. यामध्ये दुष्काळासाठी लागु केलेला तीन रुपये प्रतिलिटर सेसचा समावेश आहे. राज्य सरकारला पेट्रोल डिझेल वरील करापोटी 30 ते 40 रुपये प्रति लिटर मिळत आहेत. यातुनच पेट्रोल आणि डिझेलमध्ये कपात करून पेट्रोलसाठी पाच रुपये तर डिझेलसाठी दहा रुपये सवलत द्यावी अशी मागणी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, चिटणीस अनिल खडपेकर, साईनाथ कळझुनकर, युवामोर्चा तालुका अध्यक्ष संजय मालप, महिला आघाडी तालुकाध्यक्ष श्रद्धा घाडे, शहराध्यक्ष नेहा वराडकर, माजी नगरसेविका ज्योतीताई परचुरे, भाजप गटनेते उमेश भोसले, युवामोर्चा शहर अध्यक्ष मंदार पालशेतकर, संगम मोरे, गणेश भिडे, अमोल गोखले, केदार परचुरे आदींसह बहुसंख्य तालुका आणि शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.