गुहागर : परिवहन महामंडळाचे म्हणजेच एसटीचे विलीनीकरण महाराष्ट्र शासनामध्ये अधिकृतपणे व्हावे या व इतर मागण्याकरिता संपूर्ण राज्यात गेले दहा दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन 100% चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील एसटी सेवा सुरळीतपणे चालु असताना कामबंद आंदोलन करावे की न करावे असे दोन मतप्रवाह चालू होते. अखेरीस गुहागर तालुका एसटी आगारातील सर्व संघटनेच्या 354 कर्मचाऱ्यांनी एकत्र येत कर्मचाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने परिवहन महामंडळाचे विलीनीकरण महाराष्ट्र शासनामध्ये व्हावे याकरिता केलेल्या काम बंद आंदोलनाला गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिला आहे. भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी गुहागर आगारात जाऊन सर्व कामगारांची भेट घेऊन आपण तुमच्या सोबत असल्याचे सांगितले.
Finally, the Guhagar Taluka Bharatiya Janata Party has supported the strike by 354 employees of all the unions in the Guhagar Taluka ST Depot for the merger of the Transport Corporation with the Government of Maharashtra in view of the bright future of the employees. BJP taluka president Nilesh Surve visited Guhagar depot and met all the workers and said that he was with them.
या आंदोलनाला प्रारंभापासूनच भारतीय जनता पार्टीच्यावतीने आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पाठिंबा दर्शवला आहे. तर कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने भारतीय जनता पार्टीची वरिष्ठ स्तरावरची नेते मंडळी या संपात उतरले आहेत. गुहागर आगारातील सर्व संघटनांचे कर्मचारी आगार आवारातील दत्त मंदिरात एकवटलेले असतानाच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह येथे भेट देऊन भारतीय जनता पार्टीचा जाहीर पाठिंबा व्यक्त केला. हा संप चालू असताना एसटी सेवेमधील 35 कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत मागील 10 दिवसात आपले प्राण गमावले आहे. मात्र, याची कोणतीच खंत या निर्दयी सरकारला नसल्याची टीका यावेळी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी केली. उत्तर प्रदेशातील लखिमपुर मधील काही घटनांमध्ये आपले पाच शेतकरी बांधव जीव गमावुन बसले. याचे समर्थन कधी होऊ शकत नाही मात्र, लखिमपुरमधील शेतकऱ्यांच्या मृत्यूकरता महाराष्ट्र बंद करण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारे महाराष्ट्रातील तीघाडी सरकार कोणतीही दखल घेत नाही, यासारखे दुर्दैव नाही.
गुहागर आगारातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या व कुटुंबीयांच्या उज्वल भविष्यासाठी शासनाच्या विरोधात एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी जो लढा उभारलेला आहे. या लढ्यामध्ये गुहागर तालुक्यातील संपुर्ण भारतीय जनता पक्ष हा एसटी कर्मचाऱ्यांच्या कायम सोबत राहणार असल्याचे तालुकाध्यक्ष सुर्वे यांनी सांगितले. यावेळी तालुका सरचिटणीस सचिन ओक, नगरपंचायत भाजप गटनेते उमेश भोसले, गुहागर शहर युवा मोर्चा अध्यक्ष मंदार पालशेतकर, अल्पसंख्याक आघाडीचे इक्बाल भाई पंछी, मुनाफ दळवी, संगम मोरे, अमित जोशी, सुहास निमकर आदी उपस्थित होते.