गुहागर : कोरोनाचे संकट, निसर्ग वादळ, विदर्भात आलेला पुर, अतिवृष्टी यामुळे जनतेला वीज बीलात सवलत देऊ. अशी घोषणा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने केली होती. मात्र आपण केलेल्या घोषणेचा विसर आघाडी सरकारला पडला. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सवलत मिळणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने वीज बीले भरावीत असे जाहीर केले. त्यानंतर भाजप, मनसे या दोन्ही पक्षांनी वीज बीलात सवलत मिळावी. अशी आग्रही मागणी लावून धरली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनानुसार राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वीज बिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी (उद्या) सोमवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गुहागर महावितरण कार्यालयासमोर गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने वीजबिले होळी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी दिली. तरी या आंदोनलनात सहभागी व्हावे असे आवाहन निलेश सुर्वे यांनी केले आहे.