गुहागर : गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरोना संक्रमण काळात तसेच अन्य वेळीसुद्धा सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरविणारे, शृंगारतळी, पालशेत, वेळंब भागातील डॉक्टर तसेच समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे कोणताही कार्यक्रम न करता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या सर्व सन्माननीय व्यक्तींच्या घरी, दवाखान्यात, दुकानत पोचले. तेथे जावून या सर्वांचा सन्मान करण्यात आला.
[bsa_pro_ad_space id=3]
गुहागर तालुक्यातील पोमेंडी गावचे रहिवाशी, गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष मंगेश रांगळे यांच्या संकल्पनेतून हे सन्मान करण्यात आले. शृंगारतळी येथे रूग्ण सेवा करणारे डॉ. राजेंद्र पवार, डॉ. मंदार आठवले, डॉ. सन्मान बेलवलकर, डॉ. जरार साल्हे, डॉ. प्रशांत काळे, डॉ. अभिजित वाटेगावकर, डॉ. धानुरकर, डॉ. निलेश जावकर, वेळंब येथील डॉ. सतीश देवस्थळी, डॉ. शिल्पा देवस्थळी व अन्य डॉक्टरांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
पालशेत व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना अहोरात्र आरोग्य सेवा देणारे डॉ. बाळासाहेब ढेरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची प्रतिमा देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच पालशेत येथेच ४३ वर्षे जनतेची आरोग्य सेवा केल्याबद्दल ७३ वर्षीय अनुभवी डॉक्टर विखारे यांचा सन्मान करण्यात आला.
आरोग्य सेवेबरोबरच कायमच समाजोपयोगी कामे करणारे, आपत्तीकाळात स्वखर्चाने जनसेवा करणारे दानशूर व्यक्तिमत्व असलेले अरूण गांधी, प्रसिद्ध उद्योजक नासीम मालाणी, मोहन संसारे यांचाही यानिमित्त सन्मान करण्यात आला. या सन्मानीय व्यक्तींनी कोरोनाच्या काळात देखील संपूर्ण गुहागर तालुक्यात मदतकार्य केले आहे. यावेळी भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे, महेश तोडणकर, सुधीर कनगुटकर, युवा कार्यकर्ते श्रीकांत मोरे, रोशन गायकवाड आदी उपस्थित होते.