• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राष्ट्रवादीतर्फे उद्या गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम

by Ganesh Dhanawade
December 11, 2020
in Old News
16 0
0
राष्ट्रवादीतर्फे उद्या गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

गुहागर :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त उद्या १२ रोजी सकाळी ७.३० वाजता गुहागर समुद्र चौपाटीवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर तालुक्यातील शाळांना कोरोना तपासणी साहित्य व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन नाव नोंदणीद्वारे बेरोजगारांना कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत शृंगारतळी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात मोठ्या स्क्रीनवर खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. या कार्यक्रमाचा शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या तालुक्यातील तमाम जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, विधानसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष दीपक जाधव, जिल्हा सरचिटणीस विजय मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, युवकाचे तालुकाध्यक्ष गौरव वेल्हाळ, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर, गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर यांनी केले आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNCPNews in Guhagarगुहागर समुद्र चौपाटीटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्याराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलोकल न्युजशरद पवार
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.