कै. समाज कार्यकर्त्यांची अभिवादन व शोकसभा संपन्न
गुहागर : कोरोना सारख्या महाभयंकर काळात जे – जे थोर नेते, समाज कार्यकर्ते मृत झाले, आपल्यातून निघुन गेले त्यांच्या कुटुंबावर, पर्यायाने कुणबी समाजावर जो दु:खाचा डोंगर कोळला आहे. समाजाची फार मोठी हानी झाली आहे. या तालुक्याचे माजी आमदार, लोकनेते, कुणबी समाजाचे दैवत कै. रामभाऊ बेंडल यांच्या समाज कार्यात तन,मन,धन अर्पूण स्वत:ला झोकून देऊन बेंडल साहेबांना सावली सारखी साथ देणा-या जेष्ठ समाज कार्यकर्त्यांचे आपल्यातून निघून जाणे म्हणजे मनाला चटका लावणारी गोष्ट आहे. त्यामूळेच समाज कार्यकर्त्यांची अभिवादन व शोकसभा घेणे त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे आमचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व कुणबी समाजोन्नती संघाचे तालुका अध्यक्ष रामचंद्र हुमणे यांनी केले.
In a terrible time like Corona, a mountain of grief has fallen on the families of the great leaders, social activists who died, alternatively on the Kunbi community. That is why it is our first duty to greet the social workers and to hold a mourning meeting to glorify their work, said Ramchandra Humane, President of Guhagar Taluka Kunbi Nagari Sahakari Patsanstha and Taluka President of Kunbi Samajonnati Sangh.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील गुहागर बाजार भवनच्या श्री. संत तुकाराम महाराज सभागृहात कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर ग्रामीणचे माजी शाखाध्यक्ष कै. सदाशिव सोनू आदवडे, माजी जि. प. सदस्य कै. काशिनाथ गो. डिंगणकर, शाखा उपाध्यक्ष कै. गजानन स. बेंडल गुरूजी, कै. जगन्नाथ रा. कांबळे गुरूजी, कै.उदय नितोरे, कै. तानाजी ठोंबरे, डॉ.बाबूराव देवाळे, डॉ. उदय देवाळे, कै. मनोहर जावळे, कै. वैभव पाते, कै. गणू पाष्टे आदिंना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र हुमणे होते. ते पुढे म्हणाले की, कुणबी समाजाचे आमचे दैवत कै. रामभाऊ बेंडल साहेबांचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी ही मंडळी तन, मन, धन, अर्पण करून समाज सेवेसाठी अनंतात विलीन झाली, या मंडळीच्या कार्याला सलाम करतो. या तालुक्याचे नेतृत्व कै.रामभाऊ बेंडल साहेबांचे सूपूत्र नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी करावे. राजेश आमचा समाजाचा तूम्हाऺला पाठींबा आहे. कुणबी समाजोन्नती संघ तालुका गुहागर मुंबई, ग्रामीण या संघटनेच्या माध्यमातून जो विचार होईल, तेव्हा तुम्ही, आम्ही एक असायला पाहीजे, असे राजेश बेंडल यांना सांगून आपण एकत्र आलो तरच या समाज कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहिल्याचे सार्थक होईल अशा शब्दात रामचंद्र हुमणे यांनी श्रद्धांजली वाहिली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविकात संघाचे सेक्रेटरी तुकाराम निवाते यांनी मृत सर्व समाज कार्यकर्त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी मुलूंड येथे होणा-या कुणबी समाजॎच्या वस्तीगृहाच्या इमारतीला गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था आबलोली यांची वतीने मान्यवरांच्या उपस्थीतीत ५१ हजाराचा चेक प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला कुणबी समाजउन्नती संघ गुहागर शाखेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे, कुणबी समाजउन्नती संघ मुंबईचे अध्यक्ष कृष्णा वणे, उपाध्यक्ष पांडूरंग पाते , नगराध्यक्ष राजेश बेंडल, अनंत मालप, गणपत पाडावे, महादेव साटले, माजी सभापती विलास वाघे, दत्ताराम निकम, उपसभापती सिताराम ठोंबरे, पंचायत समीती सदस्य रवींद्र आंबेकर, शाखेचे सरचिटणीस तुकाराम निवाते, महादेव वणे, अनंत पागडे, वैभव आदवडे, तुकाराम दवंडे, शंकर ठोंबरे, राजेंद्र भागडे, सूनिल रामाणे, शांताराम वाघे, शिवराम आंबेकर, संदिप मांडवकर, सुशिल आग्रे, आदी उपस्थित होते.