गुहागर : येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या सौ. मनाली बावधनकर यांनी लिहिलेल्या ओघळलेले मोती या ललिल कथांच्या पुस्तकाचा प्रकाशन मोठ्या दिमाखात पार पडला.
Professor in junior college Written by Manali Bavdhankar the publication of a book of Oghalalele Moti, Lalil Katha, was a big success.


या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा, सार्वजनिक ज्ञानरश्मि वाचनालय आणि गुहागर न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. तानाजीराव चोरगे सभागृह, ज्ञानरश्मि वाचनालय गुहागर येथे झाले. पुस्तकाचे प्रकाशन दापोलीतील गझलकार प्रा. कैलास गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या छोट्या घटनांचाही आपल्यावर चांगला वाईट परिणाम होत असतो. याचे प्रतिबिंब प्रा. मनाली बावधनकर यांनी ओघळलेले मोती या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे.


या प्रकाशन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुहागरच्या तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे, श्रीमती मनिषा दामले, तरुण भारताचे तालुका प्रतिनिधी सत्यवान घाडे, जेष्ठ साहित्यिक राष्ट्रपाल सावंत, साहित्यिका अंजली बर्वे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागरचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तर या कार्यक्रमासाठी व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण परचुरे, ऍड. संकेत साळवी, जीवनश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे, खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल सावंत, प्रा. रश्मी आडेकर, ऍड. मनाली आरेकर, विनिता नातू, नीला नातू, स्नेहा परचुरे, प्रा. विराज महाजन, श्रध्दा घाडे, गुहागर नगरपंचायतीच्या माजी उप नगराध्यक्ष स्नेहा भागडे, प्रशांत कांबळे, अजय खातू, अतुल साखरकर, बाबासाहेब राशीनकर, ईश्वरचंद्र हलगरे, निलेश गोयथळे, सुधाकर कांबळे, ग्रंथपाल सोनल घाडे, मानसी बावधनकर, अविनाश बाचल, माजी उपनगराध्यक्ष नरेश पवार आदी उपस्थित होते.

