• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

साई गिफ्ट्स स्पोर्ट्स आणि सायकल दालनाचा शानदार शुभारंभ

by Ganesh Dhanawade
October 28, 2021
in Old News
16 0
0
साई गिफ्ट्स स्पोर्ट्स आणि सायकल दालनाचा शानदार शुभारंभ
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आमदार भास्करराव जाधवांच्या हस्ते उद्घाटन

गुहागर : येथील पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. विशाल बेलवलकर यांच्या नव्याने सुरू केलेल्या ‘साई गिफ्ट्स स्पोर्ट्स आणि सायकल’ या दालनाचे गुहागर विधानसभा मतदार संघाचे आम.भास्करराव जाधव यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
Police Patil and social workers from Srungartali Mr. Vishal Belwalkar’s newly started ‘Sai Gifts Sports and Bicycle’ hall was cut by MLA Bhaskarrao Jadhav of Guhagar Assembly constituency the ribbon was cut by hand.

शृंगारतळी येथे श्री. विशाल विश्वनाथ बेलवलकर व सौ. मीरा बेलवलकर तसेच संपूर्ण बेलवलकर परिवाराने या प्रसंगी आम. जाधवयांचे यथोचित स्वागत केले. या परिवाराचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करुन आम. जाधव याप्रसंगी म्हणाले की, सामाजिक आणि राजकीय काम करत असताना तरुणांनी आपल्या व्यवसायाकडे व त्याच्या भरभराटीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. विशाल बेलवलकर यांचे याबाबतीतले कर्तृत्व वाखाणण्यासारखे आहे असेही ते म्हणाले. आजकाल सरकारी किवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरीची वानवा असताना तरुणांनी स्वतंत्र्यपणे उद्योग निवडून तो यशस्वीपणे चालविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या शुभारंभ सोहळ्याला पंचायत समितीचे उपसभापती सीताराम ठोंबरे, सदस्य सुनील पवार, जि.प.सदस्य प्रवीण ओक, नेत्रा ठाकूर, शृंगारतळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित बेलवलकर, विनायक मुळे आदींसह शृंगारतळीतील अन्य व्यापरी उपस्थित होते. या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी गुहागर तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुधाकर खेतले, सचिव अरविंद पड्याळ, सत्यप्रकाश चव्हाण, अनिल घाडे, स्वप्नील बारगुडे, सुरेश सावंत आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

साई गिफ्ट्स स्पोर्ट्स आणि सायकल’ या नव्या दालनात विविध प्रकारचे गिफ्ट, लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत विविध प्रकारच्या सायकल, खेळणी, खेळाचे साहित्य, सन्मानचिन्ह, चषक, भिंतीवरील फ्रेम अशा असंख्य वस्तू एकाच ठिकाणी मिळणार आहेत.

Tags: Assembly constituencyGuhagarGuhagar NewsMarathi NewsMLA Bhaskarrao JadhavNews in GuhagarSai Gifts Sports and Bicyclesocial workersआम.भास्करराव जाधवआमदार भास्करराव जाधवगुहागर विधानसभा मतदार संघटॉप न्युजताज्या बातम्यापंचायत समितीमराठी बातम्यालोकल न्युजव्यवसायव्यापारी संघटनाशृंगारतळी व्यापारी संघटनासाई गिफ्ट्स स्पोर्ट्स आणि सायकल दालनसामाजिक कार्यकर्ते
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.