आमदार अनिकेत तटकरे यांचे प्रतिपादन
गुहागर : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संस्थेच्या चिपळूण येथील एरोफिनिक्स एव्हीएशन अकॅडमीला कोकण विधानपरिषद आमदार श्री.अनिकेत तटकरे यांनी नुकतीच भेट दिली. संस्थेचे कार्याध्यक्ष साहिल आरेकर यांनी त्यांचे स्वागत केले व संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या कोर्सेस विषयी माहिती दिली.
Aniket Tatkare recently visited the Aerofinics Aviation Academy at Chiplun of the late Sadanand Arekar Pratishthan, Sahil Arekar, Executive President of the institute welcomed him and informed him about the courses made available to the students.

आ. अनिकेत तटकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना भविष्यात मोठया प्रमाणात रोजगार मिळू शकतात असे मत आ. श्री. तटकरे यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते श्री.अजय बिरवटकर, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ. चित्राताई चव्हाण, चिवेली ग्रामपंचायत सरपंच राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष श्री. योगेश शिर्के आदी उपस्थित होते.
