अमोल गोयथळे यांनी राज्यमंत्री अदिती तटकरेंची घेतली भेट
गुहागर, ता. 10 : गुहागर नगरपंचायतीला प्रोत्साहनपर मिळालेल्या 1 कोटीच्या बक्षिसापैकी शिल्लक 40 लाख रुपये वर्ग करावेत. नगरपंचायतीला कायमस्वरुपी मुख्य कार्यकारी अधिकारी मिळावा. अशी विनंती गुहागरचे नगरसेवक अमोल गोयथळे यांनी राज्यमंत्री अदिती तटकरे यांना केली आहे. Give Remaining Amout to Guhagar NP


अमोल गोयथळे गुहागर (Guhagar) नगरपंचायतीच्या स्वच्छता आणि आरोग्य समितीचे सभापती होती. त्यांच्या सभापती पदाच्या कार्यकाळात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (Swachh Maharashtra Abhiyan)अंतर्गत हगणदारी मुक्त नगरपंचायत या स्पर्धेत गुहागर नगरपंचायतीला 1 कोटी रुपयांचे बक्षिस मिळाले होते. या बक्षिसापैकी 60 लाख रुपये दोन हप्त्यांमध्ये गुहागर नगरपंचायतीकडे महाराष्ट्र शासनाने वर्ग केले. मात्र उर्वरित 40 लाख रुपये अजुनही जमा झालेले नाहीत. (Give Remaining Amout to Guhagar NP) गुहागर नगरपंचायत स्तरावर या रक्कमेबाबत पाठपुरावा सुरु आहे. या पाठपुराव्याला बळ मिळावे म्हणून नगरसेवक अमोल गोयथळे यांनी राज्यमंत्री अदिती तटकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.


गुहागर नगरपंचायतीला मिळालेल्या बक्षिस, दोन हप्त्यात मिळालेली रक्कम याबाबतची माहिती सांगितली. कागदपत्रे दिली. उर्वरित 40 लाख रुपयांची रक्कम नगरपंचायतीकडे लवकरात लवकर वर्ग होण्यासाठी पाठपुरावा करावा. अशी विनंती राज्यमंत्री तटकरे यांना केली आहे. याच भेटीत अमोल गोयथळे यांनी कायमस्वरुपी मुख्याधिकारी (Chief Executive Officer)मिळण्यासाठी राज्यमंत्री तटकरे यांना विनंती केली आहे. Give Remaining Amout to Guhagar NP