गुहागर : तालुक्यातील खोडदे देऊळवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार असून गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील रमाकांत साळवी यांच्या बैलावर काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. वनविभागाने लवकरात लवकर या वाघाला पकडावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेले तीन महिने बिबट्याचा मुक्त संचार चालू असून अनेक गुरे मारली आहेत .
There is free movement of leopard at Khodade Deulwadi and there is an atmosphere of fear in the village. Ramakant Salvi’s ox in the village was attacked and killed by a leopard a few days back. The villagers have demanded that the forest department catch the tiger as soon as possible. In the last three months, leopards have been roaming free and many cattle have been killed.
तसेच तालुक्यातील वरवेली येथेही बिबट्याने घरातील पाळीव प्राण्यांना भक्ष्य केले आहे. पेवे खरेकोंड येथे पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला होता. एकंदरीत तालुक्यात अनेक ठिकाणी भर दिवसा देखील बिबटे नागरीकांना दिसून येत आहेत. रात्रीच्यावेळी नागरीकांना घराबाहेर फिरणे धोकादायक झाले आहेत. बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होऊनसुध्दा वन विभाग सुस्त असल्याचे दिसून येत आहे.