गुहागर : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार पेवे येथील कार्यतत्पर तलाठी श्री. बालाजी सुरवसे यांच्या माध्यमातून २ तलाठी सजामधील ९ महसुली गावातील शेतकऱ्यांना मोफत ७/१२ उतारा घरपोच वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ पेवे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. प्रशांत जांभुंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
According to the circular of the state government on the occasion of Mahatma Gandhi’s birthday Prashant Jambhungekar, Chairman, Peve Tantamukti Samiti, inaugurated the program of distributing free 7/12 transcripts to the farmers of 9 revenue villages in 2 Talathi Saja through Talathi Balaji Survase .
यावेळी माजी जि. प. सदस्य अशोक पारदळे, युवा कार्यकर्ते खालीद खान, शंकर भुवड, मिलिंद कदम, रत्नदिप जाधव, ग्रामसेवक श्री. डोलारी, कृषी सहाय्यक श्री. बांगर, कोतवाल संदेश कदम, श्री. दिवाडकर, श्री. नरळकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून तलाठी श्री. सुरवसे यांनी महसुल विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. तसेच ई-पिक अॅपद्वारे पिक पाहणीची नोंद शेतकऱ्यांनी कशा पध्दतीने करावी याचे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. सर्व महसुली गावामध्ये ७/१२ वाटप आणि ई-पिक पाहणी नोंदी तलाठी सुरवसे यांनी नियोजित पद्धतीने सुरू केल्याने या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.