लक्ष्मी असंपर्कित, प्रथमा, सानवी, रेवा, वनश्री कोकणातच
गुहागर, ता. 29 : समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी दापोली, गुहागर येथे अंडी घालण्यासाठी आलेल्या 5 कासवांना जानेवारीत सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले होते. या कासवांवर लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळी नावे देण्यात आली होती. टॅगिंग केलेल्यापैकी चार कासवे संपर्कात असून लक्ष्मी कासव संपर्काबाहेर आहे. प्रथमा कासव मुंबई परिसरातच असून ती गुजरातच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे. Four out of five tagged turtles in contact

जानेवारी 2022 मध्ये वेळास येथील समुद्रात पहिले कासव सॅटेलाइट टॅगिंग करून सोडण्यात आले. या कासवाला प्रथमा असे नाव देण्यात आले होते. दुसरे कासव आंजर्ला समुद्रकिनाऱ्यावरून सोडण्यात आले. त्याचे सावनी असे नाव ठेवण्यात आले होते. उर्वरित तीन कासवे गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरून सोडण्यात आली होती. त्यांची नावे वनश्री, रेवा, सानवी अशी ठेवण्यात आली होती. आज अडीच महिन्यानंतरही प्रत्येक सॅटेलाइट टॅगिंग कासवावर लक्ष ठेवले जात असून, त्यांच्या नोंदी ठेवण्यात येत आहेत. Four out of five tagged turtles in contact

असा सुरू आहे प्रवास
प्रथमा चा वेळासपासून 250 कि.मी. प्रवास, डहाणूपासून 86 कि.मी.
सावनी चा आजर्लेपासून 101 कि.मी. प्रवास, मुरूडपासून 73 कि.मी.
वनश्री चा गुहागरपासून 74 कि.मी. प्रवास, गणेशगुळेपासून 5 कि.मी.
रेवा चा गुहागरपासून 156 कि.मी. प्रवास, तोंडवलीपासून 5 कि.मी.

कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. कासवांच्या संवर्धनासाठी वनविभागासह कासवमित्रही सातत्याने संवर्धनाचे काम करीत असतात. कोकण किनारपट्टीवरील ही कासवे किनाऱ्यावर अंडी घालून गेली की, त्यांचा पुढील प्रवास कसा होतो. यावर अद्यापपर्यंत अभ्यात झालेला नव्हता. पूर्व किनारपट्टीवर यापूर्वी भारतीय वन्यजीव संस्थेने (Wildife Institute of India) अभ्यास केला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील अभ्यासासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने वनविभाग, कांदळवन प्रतिष्ठान मार्फत वेळास आंजर्ले, गुहागर किनाऱ्यावर पाच कासवांना सॅटेलाइट टॅगिंग केले. Four out of five tagged turtles in contact

कोकणातील किनाऱ्यावर अंडी घातल्यानंतर त्या कासवांचा पुढील प्रवास सुरू झाला आहे. टॅगिंगव्दारे कासव कुठे आणि कसा प्रवास करतात, याची माहीती गोळा केली जात आहे. वेळास येथून सोडण्यात आलेल्या प्रथमा कासवाने 250 कि.मी. अंतर पार केले असून, ते सध्या डहाणूपासून 86 कि.मी. खोल समुद्रात आहे. तेथून ते गुजरातच्या दिशेने जाण्याची आहे. सावनी ने चा आजर्ले किनारी 25 जानेवारीला 87 अंडी घातली. त्यानंतर हे पुन्हा महिनाभराने केळशी किनारी अंडी घातली. हे कासव मूरूडपासून 73 कि.मी. अंतरावर आहे. कासवे कमी कालावधीत पुन्हा अंडी घालू शकतात, याची नोंद या निमित्ताने अभ्यासकांना करता आली. वनश्री चा गुहागरपासून 74 कि.मी. प्रवास, व पुढे गणेशगुळेपासून 5 कि.मी. अंतरावर आहे. तर रेवा चा गुहागरपासून 156 कि.मी. प्रवास, व पुढे तोंडवलीपासून 5 कि.मी. अंतरावर आहे. Four out of five tagged turtles in contact

दरम्यान पाच कासवांपैकी गुहागर किनाऱ्यावर टॅगिंग केलेल्या लक्ष्मी कासवाचा संपर्क अल्पावधीतच तुटला आहे. या कासवाची 2 मार्चला शेवटची नोंद करण्यात आली होती.
अशी आहेत अभ्यासकांची निरिक्षणे
सावनी चा माघारी येण्याचा प्रवास
प्रथमा वेगाने पुढे सरकत आहे.
वनश्री व रेवा अंडी घातलेल्या ठिकाणी रेंगाळत आहे.
बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
सॅटेलाइट टॅगिंग करुन वनश्रीला सोडले समुद्रात
video पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
