गुहागर : दिवाळी निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर, सांस्कृतिक विभाग मनसे गुहागर यांच्यातर्फे ” किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
On the occasion of Diwali, Maharashtra Navnirman Sena Guhagar, Cultural Department MNS Guhagar has organized a “Fort Competition”.


स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रू २०२१/- व चषक आणि सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रू १५५१/- व चषक आणि सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रू ११११/- व चषक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. स्पर्धा फक्त गुहागर तालुका मर्यादित असेल. किल्ला कमीत कमी २×२ फूट किंवा जास्त आकारामध्ये असावा. पूर्णपणे इकोफ्रेंडली असावा. ग्रुप किंवा वैयक्तिक कोणीही सहभाग करू शकतो ( वयाची अट नाही ). नाव नोंदणी दि. १/११/२०२१ पर्यंत करणे बंधनकारक राहील. किल्ला तयार करुन किल्ल्याविषयी सादरीकरणचा २ ते ३ मिनिटाचा बनवलेला व्हीडीओ तसेच किल्ल्याचे फोटो दि. ४/११/२०२१ पूर्वी देणे अनिवार्य आहे. नामनिर्देशित झालेल्या १० स्पर्धकांच्या किल्ल्याची पहाणी प्रत्यक्ष केली जाईल. बक्षीस वितरणाचे तारीख विजेत्यांना कळविण्यात येईल.
तरी इच्छुक स्पर्धकांनी सहभाग घेण्यासाठी रविंद्र खांडेकर ९४२३६५४४२३, प्रसाद विखारे ९५५२७०४७१४, प्रीतम सुर्वे ९६६५७२१०७४, दिपक सुर्वे ८००७०२६६४६, स्वप्नील कांबळे ७४२०९२४८२६ / ७७३८६७९५७५ येथे संपर्क साधावा असे आवाहन मनसे गुहागरचे अध्यक्ष विनोद जानवळकर व सांस्कृतिक विभाग प्रमुख राहूल जाधव यांनी केले आहे.

