• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

माजी सभापती संपदा गडदे यांचे निधन

by Ganesh Dhanawade
May 19, 2021
in Old News
19 0
0
माजी सभापती संपदा गडदे यांचे निधन
36
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपले

गुहागर : गुहागर पंचायत समितीच्या माजी सभापती आणि महिला सक्षमीकरणाच्या कार्यकर्त्या असलेल्या तालुक्यातील तवसाळ येथील संपदा संजय गडदे यांचे कोरोनाने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्या 53 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती संजय, मुलगा आशीष, मुलगी स्नेहा, सून, नातवंड, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच तालुक्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
Sampada Sanjay Gadade of Tavasal passed away on Tuesday evening while undergoing treatment at Ratnagiri District Hospital. Many expressed the feeling of losing an all-round personality in the taluka.

संपदा गडदे यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर असाच होता. सुरुवातीला पडवे व आबलोलीमध्ये महिलांसाठी शिवणकोर्स घेत असत. त्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणूनही काम केले आहे. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. त्या एवढ्यावरच न थांबता महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या समनव्यक म्हणून काम सुरू केले. महिला सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न आणि मार्गदर्शन करत असत. बचत गटांना घेऊन विविध ठिकाणी जाऊन खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले.
गडदे यांना कामाची पोच पावती म्हणून 2007 ला पंचायत समिती निवडणुकीची उमेदवारी मिळाली. सर्व उमेदवार पडले. मात्र, संपदा गडदे या राष्ट्रवादीकडून एकमेव सदस्या निवडून आल्या. राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना गुहागर तालुक्यात भाजपची सत्ता होती. अशा परिस्थितीमध्येही विकासकामे करून आपल्या कामाचा ठसा उमटवला.
दरम्यान, आ. भास्करराव जाधव गुहागरचे पालक आमदार झाल्यावर संपूर्ण तालुक्यात राष्ट्रवादीचा झंझावात सुरू झाला. आणि 2012 च्या पंचायत समितीच्या निवडणूकित संपदा गडदे या दुसऱ्यांदा भरघोस मतांनी निवडून येत सभापती पदी विराजमान झाल्या. 
सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी पट संख्या कमी होत असल्याने तालुक्यातील मराठी शाळा सेमी इंग्रजी केल्या. या उपक्रमामुळे जि. प. च्या मराठी शाळा बंद होता होता वाचल्या. याचे सर्व श्रेय हे गडदे यांना जाते. अधिकारी व कर्मचाऱ्यांची योग्य सांगड घालून सर्वसमावेशक विकासकामे केली. विरोधी पक्षाच्या सदस्यांना कधीच वेगळी वागणूक दिली नाही. त्यांच्या कामाची दखल खुद्द खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खा. सुनील तटकरे यांनी घेतली. त्यांचे नेहमीच कौतुक केले.
शिक्षणाची प्रचंड आवड असल्याने परिस्थितीमुळे राहिलेले शिक्षण सभापती असताना पूर्ण केले. विविध कोर्सेस पूर्ण केले. यासाठी मुलगी स्नेहा हिची मदत झाल्याचे त्या नेहमीच आवर्जून सांगत असत. जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणूनही काम केले. विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
संपूर्ण गडदे कुटुंब कोरोनग्रस्त झाले होते. काही दिवसांपूर्वी गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी संपदा गडदे यांना दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. समाजकारण आणि राजकारणातील एक चांगले नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांचे पती संजय गडदे हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी शाखाधिकारी आहेत. तसेच त्यांची कन्या कु. स्नेहा संजय गडदे हिला नुकतेच अमेरिकेमध्ये एमएस ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarकोरोनाकोरोना चाचणीकोरोना बातम्याकोरोना महामारीगुहागर पंचायत समितीटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामहिला सक्षमीकरणरत्नागिरी जिल्हा रुग्णालयलोकल न्युजसंपदा गडदेसभापती
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.