आंबा, काजू बागांची नुकसानी
गुहागर : तालुक्यातील देवघर परीसरात(Deoghar premises) माळरानावर रविवारी दुपारी वणवा (Forest Fire) लागल्याने येथील परिसरातील आंबा व काजु बागायती बेचिराख झाल्या आहेत. या वणव्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान(Damage) झाले असून या वणव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी(Demand) येथील बागायतदारांनी केली आहे.
गुहागर-चिपळूण या मार्गावर मागील अनेक वर्षे वणवे लागण्याच्या घटना(Incident) घडत आहेत. मात्र यावर कोणतीही ठोस कोणतीही उपाययोजना(Solution plan) आजतागायत होत नसल्याने ही वणव्यांची मालिका सुरूच आहे. वणव्यांमुळे येथील बागेतदारांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बागायतदारांनी वर्षभर केलेली मेहनत(Hard work) या वणव्यांमध्ये मातीमोल ठरत आहे. देवघर माळरानावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला वणवा जात असल्याने लगतच्या घरानाही धोका(Danger) निर्माण होतो. दरवर्षीच्या या समस्येवर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी(Demand) येथील नागरिकांनी केली आहे.