रत्नागिरी : आत्मनिर्भर भारत पॅकेज(Self-reliant India package) अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)” राज्यात सन २०२०-२१ पासून राबविण्यात येत असून ही योजना “एक जिल्हा एक उत्पादन” (ODOP)या आधारावर राबविली जात आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हयाकरिता आंबा पीक(Mango crop) निवडण्यात आले आहे.
इच्छुक अर्जदारांचे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे(PMFME) सविस्तर प्रकल्प आराखडे(Project plans) तयार करणे व त्यास बँक कर्ज(Bank loan) मंजुरी मिळवण्यास गती देण्यासाठी कृषी विभागामार्फत(Department of Agriculture) दिनांक ३ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत “अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्ज मंजुरी पंधरवडा”( Food processing industries Bank loan approval fortnight) साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने इच्छुक व्यक्ती व गटांनी (स्वयं सहाय्यत गट,शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी संस्थांनी प्रकल्प उभारणी अर्थ सहाय्यासाठी www.pmime.mofpi.gov.in या MIS पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी(District Superintendent Agriculture Officer), रत्नागिरी यांनी केले आहे.
सविस्तर प्रकल्प आराखडे करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा संसाधन(District Resources) व्यक्तींची नेमणूक करण्यात आली असून त्यांना प्रकल्प आराखडे तयार करण्यासाठीचे सेवाशुल्क शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. अधिक माहितीसीठी तालुका कृषि अधिकारी(Taluka Agriculture Officer )/उपविभागीय कृषि अधिकारी(Sub-Divisional Agriculture Officer) / जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी(District Superintendent Office of the Agriculture Officer) संपर्क साधावा.
या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणूकीकरिता(Capital investment) पात्र प्रकल्पखर्चाच्या ३५% कमाल १०.०० लाख रुपये अनुदान देय आहे. तसेच गट लाभार्थी जसे स्वयं:सहाय्यता गट(Self :Assistance Group), शेतकरी उत्पादक संस्था(Farmers Producers Association) व उत्पादक सहकारी संस्था(Productive Cooperative Society) यांना सामाईक पायाभूत सुविधा(Common Foundation Convenience) व भांडवली गुंतवणूक(Capital investment) या करिता पात्र प्रकल्पखर्चाच्या ३५% अनुदान देय आहे.या शिवाय इनक्युबेशन सेंटर(Incubation center), स्वयं सहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल(Seed capital), मार्केटींग(Marketing) व ड्रॅन्डींग आणि प्रशिक्षण(Training) या घटकांकरिता ही लाभ देय आहे.