चिपळूण : शहरातील गुहागर बायपास(Guhagar Bypass) रस्त्यालगत पाच दिवसाचे अर्भक(Infant)आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. स्त्री जातीचे हे अर्भक असून मॉर्निंग वॉकसाठी(morning walk) गेलेल्या तरुणाला (youth) ते आढळून आले. या घटनेची येथील पोलिसांनी(Police) दखल घेत अज्ञातांविरोधात(Unknown) गुन्हा दाखल (Filed a crime) केला आहे. नववर्षाच्या(New Year) पहिल्याच दिवशी ही घटना समोर आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.


शहरातील उक्ताड ते पाग दरम्यान असलेल्या गुहागर बायपास रस्त्यालगत एका पिराजवळ हे अर्भक( Infant ) आढळून आले. पाच दिवसांचा अर्भक असून एका कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत ते होते. या रस्त्यावरून मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका तरुणाला या अर्भकाचा आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा तिथे त्याला एका कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत अर्भक दिसून आले. त्याने तात्काळ पोलिसांना संपर्क करून याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या अर्भकाला कामथे रुग्णालयात(Kamathe Hospital) नेऊन वैद्यकीय तपासणी केली. अर्भकाची प्रकृती सुस्थितीत आहे. या घटनेचा तपास तातडीने सुरू करण्यात आला असून पोलिसांच्या पथकामार्फत याबाबतची चौकशी सुरु केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी दिली.