गिमवी देवघर परिसरात सुमारे 150 एकरात पसरला वणवा
गुहागर. ता. 23 : तालुक्यातील गिमवी देवघर परिसरात सुमारे 150 एकरात रविवारी (ता. 23) वणवा लागला. Vanava (fire) Spread over 150 acres वणवा सुमारे 3 किलोमिटर परिसरात पसरला होता. या वणव्यात प्रसाद निळकंठ जोशी यांच्या 18 एकर जागेतील 350 काजू, अन्य शेतकऱ्याचे 100 काजू यासह 11 शेतकऱ्यांच्या आंबा, काजू, नारळच्या बागा जळून खाक झाल्या. दरवर्षी या भागात 3 वेळा वणवे लागतात. या समस्येचे निराकरण करण्यात स्थानिक जनता, प्रशासनाला यश आलेले नाही.
दरवर्षी येणारा हा वणवा येथील ग्रामस्थांसाठी सवयीचा बनला आहे. दिवाळीनंतर अनेक ग्रामस्थ आपल्या घराभोवतीचा इता काढतात. म्हणजे घराच्या कपांऊंडच्या बाजुने सुमारे 15 फुट जागेतील गवत बेणतात. त्यामुळे घर, परसाव वणव्यापासून सुरक्षित रहाते. Vanava (fire) Spread over 150 acres
संबंधित बातमी : देवघर माळरानावर वणवा
ग्रामस्थ समीर साळवी म्हणाले की, काही वेळ माळरानावरील वेगवान वाऱ्यामुळे वीजेच्या तारा एकमेकाला चिकटून होणाऱ्या स्पार्किंगमुळे वणवा लागतो. बहुतांश वेळा विडी सिगारेट ओढणारे रस्त्याच्या कडेला थोटूक टाकून जातात. त्याने वणवा लागतो. अपवादात्मक परिस्थितीत शेतकरी जागा साफ करण्यासाठी गवत जाळतात. वाऱ्यामुळे ति आग अनियंत्रीत झाल्यास वणवा लागतो. पण अशावेळी सदर शेतकऱ्याला ग्रामस्थ गुन्हेगार ठरवतात. त्यामुळे मनुष्यबळ सोबत घेतल्याशिवाय अशी आग लावण्याचे धाडस स्थानिक शेतकरी करत नाहीत. Vanava (fire) Spread over 150 acres
क्षेत्रीय वनाधिकारी राजश्री किर म्हणाल्या की, देवघर गिमवी परिसरात लागणारे वणवे खासगी जागेतील असून मनुष्यनिर्मित आहेत. अशा वणव्यांमध्ये होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याची तरतूदच नाही. वणवे रोखण्यासाठी घर परसावाप्रमाणे ग्रामस्थांनी रस्त्याच्या बाजूने असलेले गवत काढण्याची मोहिम राबवली पाहिजे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्थांनी जनजागृती करावी. Vanava (fire) Spread over 150 acres