लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश
गुहागर : जयगड येथील बेपत्ता झालेल्या नावेद -२ या बोटीवरील गुहागर तालुक्यातील सहा मयत मच्छिमारांच्या कुटुंबियांना जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, माजी सरपंच नवनीत ठाकूर, साखरी आगर मच्छिमार संस्थेचे चेअरमन मारुती होडेकर, खारवी समाजाचे जेष्ठ नेते पांडुरंग पावसकर यांच्या पाठपुराव्यामुळे जिंदाल कंपनीने प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली आहे. तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या उपस्थितीत साखरीआगर येथे मृतांच्या कुटुंबियांना धनादेश सुपूर्द करण्यात आले.
To the families of six deceased fishermen from Guhagar taluka on the missing boat Naved-2 at Jaigad The Jindal Company has donated Rs 1 lakh each to Zilla Parishad member Netra Thakur, former Sarpanch Navneet Thakur, chairman of Sakhari Agar Fishermen’s Association Maruti Hodekar and senior leader of Kharvi community Pandurang Pawaskar. In the presence of Tehsildar Pratibha Warale, donations were handed over to the families of the deceased at Sakhariagar.
दि. २६ ऑक्टोबर रोजी जयगड येथील नासिर हुसैन मियाँ संसारे यांच्या मालकीची मासेमारी बोट नावेद-२ ही मासेमारीसाठी खोल समुद्रात गेली होती. सदरील बोट मासेमारी करून २८ ऑक्टोबरला परत किनाऱ्याला येणे गरजेचे होते. परंतु, ती काही आली नाही. या बोटीचा संपर्क होत नसल्याने बोट बेपत्ता असल्याचे जयगड येथून बोटीवरील तांडेल आणि खलाशांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. या बोटीवर साखरीआगर येथील ४, मासू, अडूर येथील प्रत्येकी १ खलाशी होता.
त्यापैकी दि ३० रोजी साखरीआगर येथील अनिल गोविंद आंबेरकर यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, अन्य सहा खलाशी अजूनही बेपत्ता आहेत. सदर घटनेबाबत राज्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित सर्व खात्याच्या वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेऊन सदर घटनेबाबत पुन्हा नव्याने तपास करण्याचे सुचित केले. तसेच जिंदाल कंपनीचे अधिकारी, प्रांताधिकारी रत्नागिरी, नौका मालक, संस्थेचे पदाधिकारी व खलाशांचे नातेवाईक यांची एकत्रित बैठक घेऊन मयतांचे नातेवाईकांना सानुगग्रह मदत देण्यात यावे, अशा सूचना केल्या.
दरम्यान, जिंदाल कंपनी व्यवस्थापनाने मृतांच्या नातेवाईकांना सहानुभूती मदत म्हणून ५० हजाराची मदत देण्याचे कबूल केले. त्यावर जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्राताई ठाकूर, नवनीत ठाकूर, साखरीआगर मच्छिमार संस्थेचे चेअरमन मारुती होडेकर, खारवी समाजाचे जेष्ठ नेते श्री. पांडुरंग पावसकर यांच्या विशेष प्रयत्नातून मयतांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या हस्ते श्री काशिखंड मंदिर येथे दनादेश नातेवाईकांना देण्यात आले.
यावेळी सौ. नेत्रा ठाकूर, नवनीत ठाकूर, सरपंच सौ. ध्रुवा पाटील, माजी सरपंच विठोबा फणसकर, उपसरपंच सुदाम आंबेरकर, चेअरमन मारुती होडेकर, सामाजिक नेते पांडुरंग पावसकर , तलाठी श्री. परिहार, ग्रामसेवक अनंत गावणंग व मच्छिमार उपस्थित होते.