जि. प. सदस्या नेत्रा ठाकूर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द
गुहागर : गुहागर तालुक्यातील वाडदई येथील सौ. संगीता भिकाजी बाईत यांची गाय व बैल बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले होते. त्यांना नुकसान भरपाईपोटी रुपये १७,६२५ /- चा धनादेश वेळणेश्वर गटाच्या जि. प. सदस्या नेत्रा ठाकूर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
Mrs. Sangeeta Bhikaji Bait from Waddai in the taluka His cow and bull died in a leopard attack Them A check of Rs. 17,625 / – has been issued for compensation. Z.P. Member Netra Thakur It was At the hands of handed over to him.
वाडदई येथील या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी म्हणून नेत्रा ठाकूर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन सदर नुकसानीचा पंचनामा करण्यास सांगितले होते. याबाबत नेत्रा ठाकूर यांनी पाठपुरावा केल्यामुळे वनविभाग रत्नागिरी चिपळूण परिमंडळ, गुहागर तर्फे नुकसान भरपाई मंजूर झाली. सदर नुकसान भरपाईपोटी रुपये १७,६२५ /- चा धनादेश संगीता भिकाजी बाईत यांना देण्यात आले.
यावेळी वन विभागाचे अधिकारी वनपाल एस. व्ही. परशेट्टे, वनरक्षक वाय. एस. सावर्डेकर, वनरक्षक ए. बी. मांडवकर, एस.बी. दुडूंगे, वेळणेश्वर– वाडदईचे माजी सरपंच नवनीत ठाकूर, वाडदई शिवसेना शाखा प्रमुख सुनील जोशी, वेळणेश्वर वाडदई माजी तंटामुक्ती अध्यक्ष विनायक कांबळे व वाडदई वरचीवाडी अध्यक्ष संदीप भेकरे उपस्थित होते.