• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेत फास्ट फूड प्रशिक्षण संपन्न

by Ganesh Dhanawade
October 1, 2021
in Old News
18 0
0
स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेत फास्ट फूड प्रशिक्षण संपन्न
36
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत दि. २१ ते ३० सप्टेंबर या १० दिवसांच्या कालावधीत फास्ट फूड पदार्थ बनविणे विषयाचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात, पावभाजी, गोबी मन्चुरिअन, रगडाकोन, भेळ, शेवबटाटापुरी, दहीपुरी, पाणी पुरी, कचोरी, समोसा, कांदाभजी, उत्तप्पा, डोसा, मेदू वडा, पुलाव, कर्ड राईस, व्हेज फ्राईड राईस, नुडल्स, मोमोज, इ. प्रकार प्रात्यक्षिकासह शिकविण्यात आले.

प्रशिक्षणात प्रात्यक्षिकासोबतच व्यक्तिमत्व विकास, उद्योजकीय सक्षमता, उद्योजकीय विकास, बँकेच्या विविध योजना याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. फास्ट फूड प्रशिक्षणात रत्नागिरी जिल्ह्यातील २९ प्रशिक्षणार्थीनी  सहभाग घेतला होता. प्रशिक्षणाच्या सांगता समारंभाला बँक ऑफ इंडिया झोनल मॅनेजर मा.श्री. केशव कुमार  साहेब प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच बँक ऑफ इंडिया जिल्हा अग्रणी प्रबंधक मा. श्री. एन. डी. पाटील, संस्थेचे संचालक मा. श्री. दर्शन कानसे, एस. बी. सिनकर व फास्ट फूड प्रशिक्षिका सौ. मृणाल बापट इ. मान्यवर उपस्थित होते.  बँक ऑफ इंडिया झोनल मॅनेजर मा.श्री. केशव कुमार साहेब यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देण्यात आले. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेत चांगल्या प्रकारे प्रशिक्षण मिळाले तसेच व्यवसायात येणाऱ्या अडचणी कशा ओळखाव्यात या विषयी विविध खेळाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. उद्योजकीय सक्षमतेमधून आमचा आत्मविश्वास वाढला, उत्पादनाची  किंमत कशी काढावी हे या प्रशिक्षणातून शिकावयास मिळाले. असे अनुभव प्रशिक्षणात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थीनी व्यक्त केले. कोणताही व्यवसाय करत असताना जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. कोकण हे पर्यटन स्थळ असल्याने तेथे नवीन व्यवसायाला उत्तम संधी आहे, त्यामुळे तरुणांनी नोकरीसाठी मोठ्या शहरात न जाता ज्या ठिकाणी पर्यटन स्थळ असतील तेथेच एखादा व्यवसाय सुरु करावा, जेणेकरून उत्पन्नही मिळेल आणि स्वत:च्या कुटुंबीयांसोबत राहतादेखील येईल. व्यवसाय करत असताना सुरुवातीला व्यवसाय छोट्या प्रमाणावर सुरु करावा. तयार केलेल्या पदार्थाच्या मागणीनुसार व्यवसायाचे स्वरूप वाढवणे गरजेचे आहे. पदार्थाची गुणवत्ता उत्तम असावी, व्यवसाय करत असताना सकारात्मक दृष्टीकोन आणि शिस्त असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीनी व्यवसाय सुरु केल्यानंतर इतरांनासुद्धा रोजगार उपलब्ध करून देणे जेणेकरून त्यांना रोजगार मिळेल. असे मार्गदर्शन बँक ऑफ इंडिया झोनल मॅनेजर मा.श्री. केशव कुमार साहेब यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थीना केले.

सदर प्रशिक्षणासाठी सौ. मृणाल बापट यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिल्रे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रसाद कांबळे यांनी केले. सदर प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी संस्थेचे प्रशिक्षक श्री. देवेंद्र सांबरे, समिता रहाटे व प्रसाद शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली व प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले

Tags: Bank of Indiafast food training courseGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in GuhagarSelf-Employment Trainingटॉप न्युजताज्या बातम्याफास्ट फूड प्रशिक्षणबँक ऑफ इंडियामराठी बातम्यालोकल न्युजस्टार स्वरोगजार प्रशिक्षण संस्था
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.