गुहागर : गुहागर तालुक्यात सध्या भात कापणी अंतिम टप्प्यात आली असून कडकडीत उन्हात देखील भात कापणी वेगाने सुरू झाली आहे. बहुतांश ठिकाणी भात कापणी अंतिम टप्प्यात आली आहे. भात कापणी झाल्यानंतर लगेचच शेतातच किंवा घराच्या बाजूला असणाऱ्या खळ्यावर भात जोडणी केली जाते. परंतु यावर्षी भात झोडणी करताना भाताच्या लोंब्यामध्ये भाताचा दाणाच नसल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत आहे. पीक तयार होण्याच्या काळात जोरदार पाऊस पडल्याच्या परिणाम दाण्यांवर झाला आहे.
Immediately after the rice is harvested In the field or on the side of the house immediately after the rice is harvested Rice is added to the threshing floor. But this year, when the paddy was threshed, there was no grain in the paddy husk It is coming to the notice of the farmers. During the ripening period of the crop Heavy rains have affected the crops.


भाताच्या फुलोऱ्यावर पावसाचा प्रभाव झाला असून भाताच्या लोंबीमध्ये दाणाच दिसून येत नाही. भात पीक उत्पादन धोक्यात येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या सुरुवाती पासून चांगला पाऊस पडला. भात कापणीनंतर लगेच भात झोडणी केली जाते. परंतु भाताच्या लोंबीमध्ये भात नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे. यावर्षी भातासाठी पोषक असा पाऊस पडला.
दरवर्षीप्रमाणे कीड रोगाचा प्रभाव फारसा जाणवला नाही. परंतु सुरवातीच्या काळात जोराचा पाऊस पडल्याने काही ठिकाणी भातशेती वाहून गेल्याचे प्रकार घडला. पुराच्या पाण्याबरोबर माती दगडाचा राब शेतात घेऊन बसला. अतिवृष्टीच फटका तालुक्यातील शेतीला बसला होता. त्यानंतर भातशेती तयार होत असताना पावसाचा तडाखा जोरदार बसला. आता हाततोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसामुळे नासाडी होण्याची भीती निर्माण झाली आहे.

