पाटपन्हाळे विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम
गुहागर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेतर्फे संपन्न झालेल्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षा म्हणजे एन. एम. एम. एस. परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. सदर परिक्षेत गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील इ. ८ वी मधील विद्यार्थी कु. फहिम अनिस धामस्कर याने ११५ गुण संपादन करून ६३.८९ टक्के व कु. हर्षदा संदीप पालकर हिने ११३ गुण पटकावून ६२.७८ टक्के संपादन करून सुयश संपादन करून शिष्यवृत्तीसाठी हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पाटपन्हाळे विद्यालयाचे हे सुयशस्वी विद्यार्थी गुहागर तालुक्यात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून अव्वल ठरले आहेत.
For students from economically weaker sections conducted by Maharashtra State Examination Council, Pune Scholarship Scheme Examination means n. M. M. S. The results of the exam were announced recently.
या विद्यार्थ्यांना शिक्षक श्री. मुंडेकर, श्री. के. डी. शिवणकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक यांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.भालचंद्र चव्हाण व पदाधिकारी , मुख्याध्यापक श्री.एस.डी हिरवे, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.