30 ग्रामस्थांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया, 90 मोफत चष्मे
गुहागर, ता. 25 : राष्ट्रीय अंध कल्याण संघ, मुंबईतर्फे मोंभार पाचेरी सडा येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर (Eye check-up camp) घेण्यात आले. या शिबीरात 240 ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. हे शिबीर आयोजित करण्यासाठी मुंबईचे ग्रामस्थ गजानन रामजी काजरोळकर यांनी विशेष प्रयत्न केले.


तालुक्यातील मोंभार पाचेरी सडा येथे राष्ट्रीय अंध कल्याण संघ शाखा मुंबई यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिर झाले. Eye check-up camp ज्ञानदीप सेवा मंडळ बौद्धवाडीच्या सभागृहात शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील नेत्र चिकित्सक दिनेश जोशी यावेळी उपस्थित होते.


शिबीरात 240 ग्रामस्थांचे डोळे तपासण्यात आले. Eye check-up camp त्यापैकी 90 ग्रामस्थांना चष्मे आवश्यक असल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांना राष्ट्रीय अंध कल्याण संघ, मुंबई तर्फे मोफत चष्मे (Free glasses) देण्यात येणार आहेत. अन्य 30 ग्रामस्थांना मोतिबिंदु (Cataract) झाल्याचे तपासणीत समोर आले. या सर्वांची नोंद डॉ. जोशी यांनी आबलोली प्राथमिक केंद्रात केली आहे. 30 जणांची शस्त्रक्रिया पूर्व तपासणी (रक्तदाब, मधुमेह आणि कोरोना) आबलोली येथे केली जाणार आहे. त्यानंतर आबलोली प्राथमिक केंद्राद्वारे 30 ग्रामस्थ व 1 नातेवाईक अशा सर्वांना चिपळूण येथील नॅब रुग्णालयात 3 फेब्रुवारीला नेण्यात येणार आहे. 4 फेब्रुवारी सर्वांच्या शस्त्रक्रिया मोफत (Free cataract surgery) केल्या जाणार आहेत. Eye check-up camp


मोंभार पाचेरी सडा येथील ग्रामस्थांनी हे शिबीर ( Eye check-up camp )आयोजित केल्याबद्दल गजानन रामजी काजरोळकर यांचे तसेच तपासणीसाठी मुंबईतून आलेले वैद्यकिय पथक आणि आबलोलीचे डॉ. जोशी यांचे आभार मानले आहेत.

