डॉ. अमित राव्हटे : जास्त पाणी पिणे आवश्यक
रत्नागिरी : १६ जाने. (क्री. प्र.), “इलेक्ट्रो थेरपी (Electrotherapy) बरोबरच तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियमित व्यायाम (Exercise) प्रत्येक खेळाडूने केला तर दुखापतीमधून तो लवकर बरा होऊ शकेल,” अशी अपेक्षा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अमित राव्हटे (Physiotherapist Dr. Amit Rawate) यांनी केली. (Exercise regularly for Fitness)
देशाचे पहिले ऑलिंपिक पदक विजेते (Olympic medalists) स्वर्गीय खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या जयंती निमित्त आणि महाराष्ट्र क्रीडा दिनाचे (Maharashtra Sports Day) औचित्य साधून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने खेळाडूंची तंदुरुस्ती या विषयावर ऑनलाइन वेबिनार (Online Webinar) आयोजित केला होता. (Exercise regularly for Fitness) यावेळी ‘दुखापतीनंतर केले जाणारे आधुनिक उपचार पद्धती’ या विषयावर डॉक्टर अमित राव्हटे यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. राव्हटे म्हणाले की, खो-खो खेळ अत्यंत वेगवान आहे. त्यामुळे खेळाडूला अनेकवेळा दुखापती होतात. मॅटवर हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खेळाडू सशक्त राहण्यासाठी आणि दुखापतीनंतर बरे होऊन पुन्हा मैदानावर येण्यासाठी मेहनत घेतली पाहीजे. यासाठी फिजीओथेरपीचा उपयोग खूप महत्वाचा आहे. फिजीओथेरपीमध्येही नवनवीन तंत्र आली असून त्याचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने अवलंब केला तर खेळाडू नव्या दमाने खेळू शकतो. नुकत्याच जबलपूर येथे झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र खो-खो संघातील काही खेळाडूंना दुखापती झाल्या. त्यांना बरे करण्यासाठी इलेक्ट्रो थेरीपी बरोबरच ड्रायनेडली आणि कायनॅसो टेपिंग या उपचार पध्दतीचा अवलंब केला. त्याचा फायदाही झाला. खेळाडू अल्पावधीत मैदानात खेळू शकले. मॅटवर खेळताना खांद्यांसह लिगामेंटच्या दुखापती होताना दिसतात. त्यावर मात करण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहीजे. तसेच खेळाडूंनी जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले. (Exercise regularly for Fitness)
ऑनलाइन वेबिनारचे प्रास्ताविक करताना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव ॲड. गोविद शर्मा यांनी वेबिनारचा उद्देश आणि आवश्यकता याची माहिती दिली. तसेच खेळाडूंना सशक्त ठेवण्यासाठी असोसिएशन सातत्याने असे उपक्रम राबवत राहणार असल्याचेही सांगितले. या वेबिनारमध्ये भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, राज्याचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सचिव ॲड. गोविंद शर्मा, खजिनदार ॲड. अरुण देशमुख, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सर्व सहसचिव यांच्यासह खेळाडू, मार्गदर्शक, क्रीडाप्रेमी आणि वृत्तपत्र प्रतिनिधी सहभागी झाले होते. (Exercise regularly for Fitness)