गुहागर : गुहागर तालुक्यातील काजुर्ली सारख्या ग्रामीण, दुर्गम भागात विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून माध्यमिक विद्यालय उभारण्याचे स्वप्न डॉ.नानासाहेब मयेकर यांनी पाहिले होते दुर्दैवाने गतवर्षी त्यांचे अकाली निधन झाले. संस्थेवर,मयेकर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. मात्र नानांनी पाहिलेले काजुर्ली विद्यालयाच्या सुसज्ज इमारतीचे स्वप्न संस्थेच्या सहकार्याने मयेकर कुटुंबीयांनी आज साकार केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करावयाच्या शैक्षणिक उपाय योजनांची पूर्तता करण्यासाठी मालगुंड एज्युकेशन सोसायटी, डॉ.नानासाहेब मयेकर यांचा परिवार आणि काजुर्लीतील कैलास साळवी, चंद्रकांत खानविलकर, सुधाकर गोणबरे, दीपक साळवी, सीमा लिंगायत, अनंत मोहिते, शाळेसाठी जागा देणारे अशोक मोहिते आदी स्थानिक ग्रामस्थ या सर्व घटकांचे मोलाचे योगदान लाभले आहे. नानासाहेबांचे शैक्षणिक कार्य आपणा सर्वांच्या सोबतीने काजुर्ली विद्यालयाच्या रूपाने अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुनील मुरारी मयेकर यांनी केले.
Dr. Nanasaheb Mayekar had dreamed of setting up a secondary school in a rural, remote area like Kajurli to facilitate the education of students. Unfortunately he passed away prematurely last year. However, the Mayekar family, with the help of the organization, realized the dream of a well-equipped building of Kajurli Vidyalaya seen by Nana.
माध्यमिक विद्यालय काजुर्ली च्या नूतन इमारत प्रवेश समारंभ व डॉ.नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली नामकरण यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. नानासाहेबांचे शैक्षणिक विचार हे दूरदृष्टीचे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कल्याणाचे होते. त्यांचेच नाव या विद्यालयाला देण्यात आले असून मयेकर कुटुंबीयांनी नानांच्या गौरवार्थ या विद्यालयाची वास्तू उभारलीआहे. येथील विद्यार्थ्यांसाठी आणि परिसरातील शैक्षणिक विकासासाठी संस्था सदैव कटिबद्ध राहील असे आश्वासन सुनील मयेकर यांनी दिले.त्यांच्या हस्ते विद्यालयाच्या नामफलकाचे अनावरण तर रोहित मयेकर यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. श्रीमती दीप्ती मयेकर, मोहन मयेकर यांच्या हस्ते नूतन इमारतीच्या चाव्या मुख्याध्यापक अमोल पवार यांच्या कडे प्रदान करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मुख्याध्यापक अमोल पवार यांनी शाळेच्या वाटचालीचा आढावा घेताना आगामी काळात राबवायचे विविध उपक्रम व विद्यार्थी प्रगती याविषयी माहिती दिली. संस्थेचे सचिव विनायक राऊत, संचालक गजानन पाटील, किशोर पाटील, रोहित मयेकर, प्रा.उमेश अपराध, काजुर्लीचे उपसरपंच सुधाकर गोणबरे यांनी डॉ. नानासाहेबांचे कार्य व काजुर्ली सारख्या दुर्गम भागात संस्थेने सुरू केलेल्या शैक्षणिक संकुलाचे, विद्या दालनाचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे सचिव विनायक राऊत,खजिनदार संदीप कदम, संचालक किशोर पाटील, गजानन पाटील, सल्लागार उमेश अपराध, विलास राणे, नंदकुमार साळवी, श्रीकांत मेहेंदळे, ट्रस्टी सुधीर देसाई, मोहन मयेकर, रोहित मयेकर, ऋषिकेश मयेकर, काजुर्लीच्या सरपंच रुक्मिणी सुवरे, उपसरपंच सुधाकर गोणबरे, पोलीस पाटील सीमा लिंगायत, तंटामुक्त समिती अध्यक्ष भालचंद्र जोशी, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार धांगडे, मेघना मोहिते, रामचंद्र गोणबरे, बाळकृष्ण राणे, चंद्रकांत गोणबरे, जिल्हा परिषद शाळा काजुर्ली नं.१ चे मुख्याध्यापक वासुदेव पांचाळ यांसह संस्थेचे पदाधिकारी,निमंत्रित संचालक, सल्लागार, मयेकर परिवारातील सदस्य, मालगुंड विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ पाटील व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, जाकादेवी विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, चाफे महाविद्यालयाच्या प्राचार्या व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, काजुर्ली विद्यालयाचे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ,पालक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाकादेवी विद्यालयाचे शिक्षक संतोष पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन काजुर्ली विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल पवार यांनी केले.