रत्नागिरी : रत्नागिरीचे बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टमार्फत शनिवारी (ता. २७) कालभैरव जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता बारा वाड्यांच्या वतीने श्रीदेव भैरी ट्रस्टमार्फत श्री भैरीबुवावर अभिषेक होईल. त्यानंतर कालभैरवाष्टकाचे पठण होईल. नंतर सत्यनारायण पूजा, होमहवन, भजन व कीर्तनाचा कार्यक्रम होईल. दुपारी १२२ ते २ – गावडे आंबरे येथील हनुमान प्रासादिक भजन मंडळ भजन सादर करेल. यामध्ये बुवा कोकणरत्न बुवा नारायण मिरजुळकर व सहकारी भजनसेवा करतील.


या दिवशी दुपारी २ ते ४ या वेळेत येथील श्री लिंगेश्वर भजन मंडळाचे बुवा रोशन ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली भजसेवा करतील. सायं ४ ते ५.३० या वेळेत किर्तनकार बुवा प्रवीण मुळ्ये हे कीर्तन सादर करतील. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कोतवडे येथील जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ बुवा विजय मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भजनसेवा करतील. तसेच रात्री ८ ते १० या वेळेत घुडेवठार येथील दत्त प्रासादिक भजन मंडळ बुवा साईनाथ नागवेकर व मंडळी भजन करणार आहेत.

