कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका शाखा गुहागरचे आयोजन
गुहागर : कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका शाखा गुहागर यांच्यावतीने जानेवारी २०२२ मध्ये साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रमातांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शिक्षक बांधवांनी आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. An Essay Competition has been organized for the school children on the occasion of the joint jubilee of Mother’s Day to be celebrated in January 2022 on behalf of Guhagar taluka branch of Kastrib Teachers Association.
सदर स्पर्धा दोन गटात होणार आहेत. (Essay Competition)
गट 1 : इयत्ता १ ते ५
स्पर्धेचा विषय – सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य,
शब्दमर्यादा – २५० शब्द
गट गट 2 : इयत्ता ६ ते ८
स्पर्धेचा विषय – स्वराज्याची प्रेरणा राष्ट्रमाता जिजाऊ,
शब्दमर्यादा – ५०० शब्द
नियम ( Essay Competition Rules)
स्पर्धकांनी आपला निबंध स्वहस्ताक्षरात आखीव तावावर कागदाच्या एकाच बाजूला लिहावा.
निबंधाच्या शेवटी आपले नाव शाळा व संपर्क नंबर लिहावा.
निबंध ३१ डिसेंबर पर्यंत खालील व्यक्तींकडे हस्ते परहस्ते पाठवून द्यावा.
निबंध पाठविण्यासाठी पत्ता पुढील प्रमाणे आहे.
गट क्रमांक १ साठी
सौ.मधुरा वैभवकुमार पवार, अवेरे कॉंम्लेक्स समोर, शृंगारतळी, पाटपन्हाळे हायस्कूल मागे. मो.नं. 8412053476,
गट क्रमांक २ साठी
सौ.प्रमोदिनी सुहास गायकवाड, आबलोली, शिक्षक कॉलनी, मो.नं. 9421100146.
आपणास स्वतःला परीक्षकांच्या पत्यावर निबंध पाठविणे शक्य झाले नाही तर कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या कोणाही सभासदांकडे दिल्यास ते पोच करतील असेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.


स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी खालील पदाधिकारी यांच्याकडे संपर्क संपर्क साधावा असे आवाहन कास्ट्राईब शिक्षक संघटना गुहागर तालुका अध्यक्ष श्री.सुहास गायकवाड व सचिव श्री. प्रकाश गोरे, कार्याध्यक्ष श्री.सुधीर कांबळे, कोषाध्यक्ष श्री. सुहास जाधव, सहसचिव श्री. वैभवकुमार पवार यांनी कैले आहे.
स्पर्धेत बक्षिसपात्र स्पर्धकांना जानेवारी २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रमातांच्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व पुस्तक भेट देऊन मान्यवर पदाधिकारी व अधिकारी यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. (Essay Competition)

