गुहागर : गुहागर तालुका प्रेस क्लब संस्थेतर्फे(Guhagar Taluka Press Club Institution) पत्रकार दिनानिमित्त(Journalist Day) उद्योजक नासीम मालाणी(Entrepreneur Nasim Malani) यांचा गुहागर गौरव पुरस्काराने(Pride Award) देऊन सन्मान(Honor) करण्यात आला.
पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या(Patpanhale Gram Panchayat) सभागृहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे (Panchayat Samiti) गटविकास अधिकारी(Group Development Officer) अमोल भोसले, पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पवार(Sarpanch Sanjay Pawar), गुहागर तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, रक्तदाते विद्याराम कदम(Blood donor Vidyaram Kadam), उद्योजक गुलामभाई तांडेल(Entrepreneur Gulambhai Tandel), पुरवठा अधिकारी प्रभूदेसाई(Supply Officer Prabhudesai), गुहागर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश धनावडे(Former President of Guhagar Taluka Press Association Ganesh Dhanawade) आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर(Darpankar Bal Shastri Jambhekar) यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रेस क्लबचे अध्यक्ष दिनेश चव्हाण(Press Club President Dinesh Chavan) यांनी सर्वाचे स्वागत केले. यावेळी प्रेस क्लबच्या(Press Club) वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर (Guhagar Taluka Press Club) या संस्थेतर्फे तालुक्यातील शृंगारतळीमधील नामवंत उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते नासिम मालाणी(Well known entrepreneur and social activist Nasim Malani) यांच्या सामाजिक मदत कार्याची(Social relief work) दखल घेत त्यांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गुहागर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते, आबालेली येथील सर्वाधिक वेळा रक्तदान(Blood donation) करणारे विद्याधर उर्फ आप्पा राजाराम कदम यांचाही जीवनदाता पुरस्काराने(Life-giver Awards) गौरव करण्यात आला.
तसेच शृंगारतळीमधील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते(Entrepreneurs and social workers) गुलामभाई तांडेल, सामाजिक कार्यकर्ते(Social workers)अरुणशेठ गांधी, महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र(Women’s Security Association Maharashtra) या संस्थेच्या गुहागर तालुकाध्यक्षा सौ. पारिजात कांबळे, सामर्थ्य सेवा संस्थेतर्फे(Strength Service Institution) विविध उपक्रम व कार्यक्रम राबवून सामाजिक सेवाव्रत(Social service vows) करणाऱ्या निगुंडळच्या सौ. प्रज्ञा धामणस्कर – ताम्हणकर व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे(New English School and Junior College, Patpanhale) या विद्यालयातील विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त(Amritmahotsav) “उत्सव स्वातंत्र्याचा गौरव स्वातंत्र्यवीरांचा” (“Celebration of freedom, glory of freedom fighters”) या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या निबंध स्पर्धेत(Essay Competition) प्राथमिक गटात प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल व शालेय व विविध आयोजित निबंध(Essays), वक्तृत्व(rhetoric), चित्रकला(painting), कथाकथन(storytelling), चित्रकला आदी स्पर्धांमध्ये सुयश संपादन केल्याबद्दल सन्मान चिन्ह, गौरवपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कोरोना महामारीत विविध उपक्रम व कार्यक्रम राबवून सामाजिक कार्य केल्याबद्दल व संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम व उपक्रमांनी समाज जागृती केल्याबद्दल गुहागर तालुका सरपंच संघटनेचा(Guhagar Taluka Sarpanch Association) गौरव करण्यात आला. पत्रकारितेमध्ये विविध स्तरावर पुरस्कार प्राप्त केलेल्या पत्रकारांमध्ये लक्ष्मीकांत घोणसे पाटील, गणेश धनावडे, उमेश शिंदे, सुरेश आंबेकर, प्रशांत चव्हाण आदींचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गुहागर तालुका प्रेस क्लबचे सदस्य गणेश किर्वे, सुरेश आंबेकर, निसारखान सरगुरो, गजानन जाधव, मारुती जाधव, योगेश तेलगडे, विनोद चव्हाण, उमेश शिंदे, अदनान खान, कृष्णकांत साळगावकर, गजानन जाधव, अमोल पोवळे, संदेश कदम, सुभाष जाधव, उद्योजक शोहेब मालाणी, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था शाखा व्यवस्थापक संजय नागवेकर आदी उपस्थित होते.