राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांचे आवाहन
गुहागर : गुहागर आगारातील सर्व एसटी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांची भेट घेऊन कर्मचार्यांच्या मागण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यावेळी तालुकाध्यक्ष आरेकर यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होऊन प्रवाशांना सेवा देण्याचे आवाहन केले.
All the ST union office bearers from Guhagar depot came together and met Guhagar taluka NCP taluka president Rajendra Arekar and requested him to provide guidance regarding the demands of the employees. At this time, taluka president Arekar appealed to the employees to come to work and provide services to the passengers.
यावेळी कर्मचाऱ्यांशी बोलताना श्री. आरेकर यांनी सांगितले की, आघाडी सरकार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घर भाडे, वेतनवाढ या मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा करून योग्य न्याय कर्मचाऱ्याना मिळवून दिला आहे. तसेच राज्य शासनामध्ये एसटी महामंडळ समितीकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. मात्र, या विषयावर चर्चा करण्यास युनियनच्या नेत्यांनी नकार दिला, हे योग्य नाही. सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की, आपण प्रथम कामावर हजर होऊन जनतेची होणारी गैरसोय दूर करावी. तुमचा समितीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू, असा विश्वास तालुकाध्यक्ष आरेकर यांनी कर्मचाऱ्यांना दिला.
विरोधी पक्ष संपाचे राजकारण करून कर्मचारी आणि प्रवास जनतेला वेठीस धरत आहे. खाजगीकरणाचा सपाटा लावलेल्या पक्षावर किती विश्वास ठेवावा, हे तुम्हीच ठरवावे, असा टोलाही आरेकरांनी भाजपाचे नसून घेता लगावला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मंदर कचरेकर, तालुका सचिव दीपक शिरधनकर, ओबीसी जिल्हा कार्यकारणी सदस्य श्रीधर बागकर, एसटी कर्मचारी सुभाष पावसकर, चारूदत्त सावंत, विवेक गानू, राजू खंडजोडे, मंगेश भोसले, प्रतीक विचारी, सिद्धेश लाकडे, संतोष दळी, प्रवीण कांबळे, गजानन सावरकर आदी उपस्थित होते.