गुहागर : भीषण महापुरात अडकलेल्या चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिवतेज फाउंडेशन संस्था व सामाजिक क्षेत्रात नव्याने प्रदार्पण करणाऱ्या युवा शक्ती मंचातर्फे भरघोस मदत तातडीने चिपळूणला रवाना केली आहे.
The Shivtej Foundation, which has always been at the forefront of social work and the newly launched Yuva Shakti Mancha in the social sector, has sent a large amount of aid to Chiplun to help the flood victims.
बुधवारी रात्रीपासून चिपळूण शहराला पुराच्या पाण्याने वेडा घातल्याने नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. पुराचे पाणी ओसरले असले तरी पूरग्रस्तांना अन्न व पाण्याची नितांत गरज आहे. तसेच कपडे व अन्य साहित्याची गरज ओळखून चिपळूण पूरग्रस्तांना पहिल्या टप्प्यातील तातडीची मदत म्हणून शिवतेज फाउंडेशन व युवा शक्ती मंच्याच्या वतीने शुक्रवारी 30 बेडशीट, 50 पाण्याचे जार व 100 बिस्कीट पुडे, जुने कपडे, जीवनावश्यक वस्तू अशी मदत नेण्यात आली आहे.
शिवतेज फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष संकेत साळवी, युवा शक्ती मंचाचे राज विखारे यांच्या नेतृत्वाखाली सोहम सातार्डेकर, श्रमिक भाटकर, अलंकार विखारे, अंकुश विखारे आदींसह अन्य युवा शक्ती मंच यांचे कार्यकर्ते ही मदत घेऊन गेले आहेत.