राज्यातील सत्ता समिकरणामुळे अनेक ठिकाणी बदलाचे वारे
गुहागर : एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या गुहागर तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे राज्यातील सत्ता समीकरणामुळे यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायतीवर मोठे बदल पहावयास मिळणार आहेत.
तालुक्यातील कोंड कारुळ, रानवी, भातगाव, तळवली, निगुंडळ, पालपेणे, नरवण, पिंपर, मळण, वेळनेश्वर, जामसुत, मासू, मुंढर, काजुली, शिवणे, गोळेवाडी, अडूर, पडवे, काताळे, उमराठ, कुडली, खामशेत, साखळी बुद्रुक, साखळी अगर, पेवे, कोळवली, गिमवी आधी २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
दिनांक २३ ते ३० डिसेंबर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र सादर करणे, ३१ रोजी ११ वाजता नामनिर्देशन पत्र छाननी, दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० दुपारी ३ वाजता नामनिर्देशनपत्रे मागे घेणे, त्यादिवशी निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत आवश्यक असल्यास मतदान, १८ रोजी मतमोजणीचा कार्यक्रम होणार आहे.