तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन
गुहागर : शासनाने नव्याने आणलेल्या ई-पीक नोंदणी अभियानाला गुहागर तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून येथील तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्याकडून गुहागर तालुक्यात प्रत्येक गावागावात ई-पीक नोंदणी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले जात आहे. नुकतेच तळवली येथे याबाबत मार्गदर्शन केले.
The e-crop registration campaign launched by the government is getting overwhelming response in Guhagar taluka and e-crop registration is being demonstrated and guided in every village in Guhagar taluka by Tehsildar Pratibha Varale. Guided on this at Talwali recently.
शासनाने शेतकरी व बागायतदार यांनी आपली पीक नोंदणी स्वतः करावी यासाठी ई-पीक पाहणी हा ऍप्स सुरू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात न जाता आपली पीक नोंदणी मोबाईलवरून करता येणार आहे. सहाजिकच यामुळे शेतकरी वर्गाला होणारा त्रास कमी होणार आहे. सध्या याबाबत संपूर्ण गुहागर तालुक्यात तहसीलदार प्रतिभा वराळे व प्रत्येक विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या उपस्थितीत हे प्रात्यक्षिक सुरू आहे. तळवली येथे देखील नुकतेच हे ई-पीक प्रात्यक्षिक व मार्गदर्शन तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले.
यावेळी मंडळ अधिकारी श्री. साळुंके, तलाठी श्री. सुरवसे, श्री भिसे, कोतवाल सुरज गिजे, पोलीस पाटील विनोद पवार, सरपंच मयुरी शिगवण, उपसरपंच अनंत डावल व ग्रा.पं. सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष व आपले सेवा सरकार केंद्राचे मालक अमोल जड्याळ तसेच शेतकरी व बागायतदार उपस्थित होते.