रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या(Education Society) गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे(Gogte-Joglekar College) माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव(Former Principal Dr. Subhash Dev) यांना विशेष सभेत श्रद्धांजली(Tribute) अर्पण करण्यात आली.( Dr. Subhash Dev Tribute to Gogte-Joglekar College)
व्यासपीठावर र. ए. सोसायटीच्या(R.A. Society) कार्यध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, माजी विद्यार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी राजन मलुष्टे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. माधव पालकर, नाना पाटील यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. सुभाष देव महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर १९९५ ते २०१४ या कालावधीत ते महाविद्यालयाचे प्राचार्य होते. ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर २०१४ मध्ये ते प्राचार्यपदावरून सेवानिवृत्त झाले. आपल्या सेवेच्या कार्यकाळात प्राचार्य म्हणून कार्य करताना त्यांनी महाविद्यालयाला सक्षम नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या आणि मुंबई विद्यापीठाच्या अनेक समित्या, आस्थापनांवर काम करताना त्यांनी अनेक मोलाच्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या. ते काही काळ मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे नियंत्रकही होते.
रत्नागिरीत प्राचार्य डॉ. देव यांनी शिक्षण विस्ताराचे कार्य अखंडपणे पार पाडले. विषयावरील प्रभुत्व, ज्ञानाची खोली, विषयाचे चिकित्सक विश्लेषण, शिस्तप्रिय शिक्षक, कुशल प्रशासक असा लौकिक त्यांनी प्राप्त केला. महाविद्यालयाच्या विकासासाठी मार्गदर्शक ठरलेले प्राचार्य डॉ. देव म्हणजे ज्ञानाचा अनमोल खजिना(Invaluable treasure of knowledge) होते. त्यामुळे ते विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कायम स्मरणात राहतील. रत्नागिरी शिक्षण संस्था (Ratnagiri Educational Institution) आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला(Gogte-Joglekar College) प्रगतीच्या शिखरावर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अतिशय शिस्तप्रिय स्वभावाच्या, कामाचा ध्यास घेतलेल्या प्रा. देव सरांनी शेकडो विद्यार्थी घडविले, त्यांच्या अकाली जाण्याने रत्नागिरी आणि कोकण विभागाच्या शैक्षणिक क्षेत्राचे खूप नुकसान झाले आहे, असे मत त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना मान्यवरांनी व्यक्त केले. श्रद्धांजली सभेला संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयातील तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, विविध विभागांचे प्रमुख आणि शिक्षकेतर कर्मचारी, र. ए. सोसायटीच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. तेजश्री भावे यांनी केले.